17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeठळक बातम्यालातूर जिल्ह्यात ६७.०३ टक्के मतदारांनी बजाविला हक्क !

लातूर जिल्ह्यात ६७.०३ टक्के मतदारांनी बजाविला हक्क !

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

सहाही मतदारसंघात २३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी
• मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल घेवून येण्यास मनाई; प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर, दि. २१ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील २० लाख ४२ हजार ७४७ मतदारांपैकी १३ लाख ६९ हजार २४५ म्हणजेच ६७.०३ टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून शनिवारी (दि. २३) मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

लातूर जिल्ह्यातील २ हजार १४३ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेली मतदार जागृती आणि मतदानासाठी येण्याच्या आवाहनाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. गतवेळच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत सुमारे ५ टक्के अधिक मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ६९.९२ टक्के, लातूर शहर विधानसभा मतदारसंघात ६२.७४ टक्के, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ६८.७१ टक्के, उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात ६७.११ टक्के, निलंगा विधानसभा मतदारसंघात ६५.७५ टक्के आणि औसा विधानसभा मतदारसंघात ६८.८८ टक्के मतदान झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीमध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात १ लाख २४ हजार ७४९ पुरुष मतदार, १ लाख ९ हजार २०० महिला मतदार आणि इतर १ असे एकूण २ लाख ३३ हजार ९५० मतदारांनी आपला हक्क बजाविला. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील १ लाख २९ हजार ९८४ पुरुष मतदार, १ लाख २० हजार ९७४ महिला मतदार आणि इतर १७ असे एकूण २ लाख ५० हजार ९७५ मतदारांनी, अहमदपूर विधानसभा मतदारसंघात १ लाख २५ हजार ७३८ पुरुष मतदार, १ लाख १३ हजार ८८६ महिला मतदार, इतर १ असे एकूण २ लाख ३९ हजार ६२५ मतदारांनी, उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात १ लाख १२ हजार ३४४ पुरुष मतदार, १ लाख ०४ हजार ५९२ महिला मतदार, इतर १३ मतदार असे एकूण २ लाख १६ हजार ९४९ मतदारांनी आपला हक्क बजाविला.

निलंगा विधानसभा मतदारसंघातील १ लाख १४ हजार ४५६ पुरुष मतदार, १ लाख ०३ हजार ६९३ महिला मतदार आणि इतर ४ मतदार असे एकूण २ लाख १८ हजार १५३ मतदारांनी आणि औसा विधानसभा मतदारसंघात १ लाख ११ हजार १५० पुरुष मतदार, ९८ हजार ४४२ महिला मतदार आणि इतर १ मतदार असे एकूण २ लाख ०९ हजार ५९३ मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यात एकूण १० लाख ६५ हजार ९१५ पुरुष मतदारांपैकी ७ लाख १८ हजार ४२१ पुरुष मतदारांनी, ९ लाख ७६ हजार ७६७ महिला मतदारांपैकी ६ लाख ५० हजार ७८७ महिला मतदार आणि इतर ६५ पैकी ३७ मतदारांनी आपला हक्क बजाविला.

२३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी

लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी सुरु होणार आहे. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लातूर शहरातील बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन येथे होईल, तर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अहमदपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होणार आहे. उदगीर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उदगीर शहरातील देगलूर रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होणार असून निलंगा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी निलंगा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे होईल. तसेच औसा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी औसा तहसील कार्यालयाजवळील प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे.

मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यात २३ नोव्हेंबर रोजी लातूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा येथे विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. या मतमोजणी केंद्रांच्या २०० मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार मतमोजणी केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यात मतमोजणीदिवशी मद्यविक्री राहणार बंद

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. यादिवशी मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लातूर जिल्ह्यातील मद्यविक्री बंद राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन बंद कालावधीत मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]