24.7 C
Pune
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रलातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावे

लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाकडे सादर करावे

आपदग्रस्तांना तातडीची मदत करावी

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

 
लातूर (प्रतिनिधी):


  लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी व परिसरात काल सायंकाळी अवकाळी वादळी पाऊस होऊन फळबागा भाजीपाला या शेती पिकांचे तसेच घरे व मालमत्तेरचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन आपदग्रस्तांना मदत करावी दिलासा द्यावा व नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे सादर करावेत असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

   मंगळवारी सायंकाळी लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी वादळी पावसासंदर्भात माहिती मिळताच पालकमंत्री ना. देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून तातडीने मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. औरादशहाजानी , हालसी, तगरखेडा, तसेच  जिल्ह्यात इतर काही ठिकाणी अवकाळी वादळी वारे व पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आंबा तसेच इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले  आहे, विजेचे खांब वाकल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे, काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून मालमत्तेचे नुकसान झाल्यासंबंधीची प्राथमिक माहिती मिळाली असून जिल्ह्यात आणखी कुठे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या संबंधी माहिती येऊन  जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी मदत पथके पाठवावीत , आपदग्रस्तांना मदत करावी व दिलासा द्यावा. त्याचबरोबर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करावा. महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी असेही निर्देशही पालकमंत्री ना देशमुख यांनी दिले आहे दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]