लातूर 🙁 प्रतिनिधी)— माझं लातूर परिवाराच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते करण्यात आले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नेत्र विभागात संपन्न झालेल्या या शिबिरात तब्बल ३६८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
माझं लातूर परिवाराच्या सामाजिक कार्याची दखल घेत पुढे नेत्र तपासणी शिबिराची व्याप्ती वाढवून तालुका स्तरावर शिबीर घ्यावे. जिल्हा मोतीबिंदू मुक्त करण्यासाठी माझं लातूर परिवाराने पुढाकर घ्यावा असे आवाहन पृथ्वीराज बी पी यांनी केले. प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी हमी त्यांनी दिली.
यावेळी मंचावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. लक्ष्मण देशमुख,नेत्र विभागाचे प्रमुख डॉ. उदय मोहिते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, ॲड. प्रदिप मोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

माझं लातूर परिवाराचे हे तिसरे मोफत मोतीबिंदू शिबीर असून या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सतीश तांदळे, अभय मिरजकर, प्रमोद गुडे, , गोपाळ झंवर, डॉ. सितम सोनवणे, ॲड.सचिन कांबळे, , काशिनाथ बळवंते, दिपरत्न निलंगेकर, श्याम भट्टड, सचिन सोळुंके, मोहसीन खान, शामसुंदर मानधना, जुगलकिशोर तोष्णीवाल, सोमनाथ मेदगे, उमेश कांबळे, प्रशांत साळुंके, सागर तापडिया, संतोष साबदे, रत्नाकर निलंगेकर, श्रीराम जाधव, यशवंत पवार, युवराज कांबळे, नामदेव तेलंगे, राजेश तांदळे, किशोर जैन, अमर करकरे, बालाजी पिचारे, ॲड. राहूल मातोळकर, ॲड.रवी पिचारे, सुनिल गवळी, अनिल माने, विनोद कांबळे, अजय कल्याणे आदी मान्यवरांनी परीश्रम घेतले.
