▪️ सर्व ग्राम पंचायत मध्ये 75 रोपे लावून अमृत वन ची निर्मिती केली जात आहे
लातूर, दि. 11 वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाने स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र योजना अंतर्गत सन 2019-24 चा पाच वर्ष कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट निर्धारित करण्यात आलेले असुन त्याअंतर्गत चालू 2023 मध्ये जिल्हा परिषद तातूरता 50.00 लक्ष वृक्ष लागवडीचे उदिष्ट शासनामार्फत प्राप्त झाले आहे आहे. त्याअनुषंगाने जि. प. मार्फत ग्रामपंचायत विभागाचे व ग्रामविकास विभागाचे वृक्ष लागवडीचे उदिष्ट सर्व तालुक्यांच्या गट विकास अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे. सदस्थितीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाचे औचित्य साधून आज दिनांक 11 ऑगष्ट 2023 रोजी महावृक्ष लागवड दिनांचे आयोजन संपुर्ण तातूर जिल्हयातील 786 ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आले होते.
सदर वृक्ष लागवड अभियान संपुर्ण जिल्हयात यशस्वीपणे राबविण्यात यावे याकरिता जिल्हा स्तरावरुन सर्व विभाग प्रमुखांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती व त्यांना या दिवशी प्रत्यक्ष गावांना भेट देवून या अभियानात सहभागी होणेविषयी निर्देशित करण्यात आलेले होते.
या अभियांनातर्गत आज जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये महावृक्ष लागवड टिनाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाची पाहणी करणेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी चाकूर तालुक्यातील नळेगाव, आष्टा व महाळंग्रा ग्रामपंचायतीस भेट दिली व त्याठिकाणी त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावातील सर्व नागरिकांना वृक्षाचे महत्व पटवून सांगितले व शासनामार्फत देण्यात आलेल्या उदिष्टाप्रमाणे मियावाकी पध्दतीने, नियमित वृक्ष लागवड पध्दतीने तसेच बिहार पॅटर्न पध्दतीने वृक्ष लागवड करावी असे आवाहन केले. त्यासाठी ग्रामपंचायतीने नुसते झाडे तावून उपयोग नाही तर ते शत प्रतिशत जगविण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी सांगितले.
ग्रामपंचायती मध्ये अमृत वन निर्मिती भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगते निमित्त आज दिनांक 11 ऑगष्ट 2023 रोजी जिल्हयातील 786 ग्रामपंचायतीमध्ये 786 अमृत वनाची निर्मिती करण्यात आली. यामध्ये अमृत वन 75 रोपे व इतर 100 ते 1000 रोपाप्रमाणे एकुण जवळपास 2 लक्ष वृक्ष लागवड केली असल्याचे तसेच या महिनाअखेर पुरेसा पाऊस झाल्यास शासनाने दिलेल्या उदिष्टाप्रमाणे वृक्ष लागवड करण्यात येईल असे या कार्यक्रमाचे जि.प.लातूरचे नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प) दत्तात्रय गिरी यांनी सांगितले.