26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*लातूर जिपच्या परिसरात स्व. मुंडे यांच्या पुतळ्याचे पाद्यपूजन*

*लातूर जिपच्या परिसरात स्व. मुंडे यांच्या पुतळ्याचे पाद्यपूजन*

लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखे 

संघर्षशील नेतृत्व पुन्हा होणे नाही – आ. कराड

लातूर जिपच्या परिसरात स्व. मुंडे यांच्या पुतळ्याचे पाद्यपूजन

           लातूर दि २९.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आठरापगड जाती धर्माना, वंचितांना न्याय देण्यासाठी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी संघर्ष केला. या संघर्षशील नेतृत्वाची उंची गाठणे कोणालाही शक्य नाही असा नेता पुन्हा होणे नाही. राज्यातील प्रशासकीय जागेत पहिला पुतळा लातूर येथे उभा राहतोय याचा मनस्वी समाधान आणि आनंद असल्याचे भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

           मराठवाड्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे लोकनेते, देशाचे माजी ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा लातूर जिल्हा परिषद मुख्यालयाच्या परिसरात जिपच्या स्वनिधीतून तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून बसवण्यात येत आहे. या पुतळ्याचे पाद्यपूजन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते रविवार २८ जानेवारी रोजी दुपारी नियोजित पुतळा परिसरात करण्यात आले.

यावेळी खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, कार्यकारी अभियंता देशपांडे, भाजपा नेते राजेश कराड, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, भाजपा पंचायत राज व ग्रामविकास सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रोहिदास वाघमारे, भाजपा ओबीसी आघाडीचे डॉ. बाबासाहेब घुले, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, अमोल पाटील, भागवत सोट, सतीश आंबेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           शेवटच्या क्षणापर्यंत आणि श्वासापर्यंत ज्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि अंतही संघर्षात झाला असे आपले दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची आठवण आली तरी डोळ्यात पाणी येते असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, माझ्यासारख्या अनेकांना आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्‍यक्ष, सभापती, पदाधिकारी केले कार्यकर्त्यांना नेता करण्याची फॅक्टरी मुंडे साहेब होते.

        शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय, त्यांचे समाधान केल्याशिवाय रात्री कितीही उशीर झाला तरी झोपत नव्हते. त्यांचा दरवाजा कधीच बंद नव्हता अडलेल्यांना, नडलेल्यांना मदत केली आज जर मुंडे साहेब असते तर देशाच्या आणि राज्याचे चित्र वेगळे राहिले असते मुंडे साहेबांच्या संस्कारात आणि कर्तृत्वात आम्ही तयार झालो त्यांच्या संस्कारातून कृपा आशीर्वादाने गोरगरीब जनतेची सेवा कशी करता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगून लोकनेते मुंडे साहेबांच्या स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रण दिले आहे. लवकरच अत्यंत चांगला आणि देखना लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.

         मुंडे साहेबांच्या प्रेरणेमुळेच आम्ही राजकारणात आलो असल्याचे खा. सुधाकर शृंगारे यांनी बोलून दाखवले तर दिलीपराव देशमुख यांनी मुंडे साहेबांच्या कार्याला उजाळा दिला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब घुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी मुंडे साहेबांच्या पुतळ्याचे शिल्पकार विजय बोंदर यांचा आ.कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

         या कार्यक्रमास धर्मपाल देवशेट्टे, विजय गंभीरे, शरद दरेकर, सुकेश भंडारे, भैरवनाथ पिसाळ, सिद्धेश्वर मामडगे, सुरेश लहाने, ईश्वर गुडे, श्रीमंत नागरगोजे, अच्युत कातळे, बालासाहेब शेप, उज्वल कांबळे, रमा चव्हाण, आनंत सरवदे, बालासाहेब कदम, लता भोसले, ललिता कांबळे, शिला आचार्य, सुरेश बुड्डे, गोविंदराव देशमुख, दिनकर राठोड, गणेश चव्हाण, ईश्वर बुलबुले, महादेव घुले, निवृत्‍ती लहाने, व्‍यंकटराव मुंडे, अरविंद फड, अरविंद सुरकुटे, गणेश केंद्रे, बाळू पाटील यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]