कार्यकर्त्यांच्या कष्टाचा; लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाचा विजय – आ.रमेशआप्पा कराड
लातूर ( माध्यम वृत्तसेवा):–लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांचा दणदणीत विजय झाला. या विजयाचा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजी करत विजयाचा मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केला. लातूर ग्रामीणचे विद्यमान आमदार धिरज देशमुख यांचा रमेश आप्पा कराड यांनी पराभव करीत मागच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर जो अन्याय झाला होता त्याचा वचपा त्यांनी काढला आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तब्बलवीसवर्षमेहनतघेतलेल्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचा,धनशक्तीविरुद्धजनशक्तीचाविजय आहे या विजया हा लाडक्या बहिणीचा मोठाआशीर्वाद मिळाला असल्याचे सांगून नवनिर्वाचितआमदार रमेशआप्पा कराड यांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना हा विजयसमर्पित करतो ,अशी भावना व्यक्त केली.
गेल्या वीस वर्षापासून गोरगरीब सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनतेच्या न्याय हक्कासाठी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात सातत्याने संघर्ष केला संघर्षाच्या या लढाईत प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांनी साथ दिली. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपाचे काम केले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात दोन वेळा पराभूत झालो असलो तरी कधीच निराश झालो नाही ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवसापासूनच त्या दिवसापासून पुन्हा त्याच जिद्दीने कामाला लागलो.
सर्वसामान्यांच्या कार्यात कार्यरत राहिलो, गोरगरिबांना मदत केली, सुखदुःखात सहभागी झालो. आरोग्याची सेवा दिली अध्यात्मिक क्षेत्र टिकून राहावे यासाठी भजनाचे साहित्य वाटप केले या सगळ्या सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय कामात सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी मला वेळोवेळी साथ दिली.
पक्षाने दिलेल्या आमदारकीचा उपयोग गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी केला असे सांगून रमेशआप्पा कराड म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीनेच भ्रष्ट पैशाच्या जोरावर मतदारसंघाला विकत घेण्याची पाप केले याची सर्वसामान्य मतदारांना मोठी चीड होती त्यामुळे ही निवडणूक मतदारांनीच हाती घेऊन माझ्या विजयाचा निर्धार केला होता.
लातूर ग्रामीण मतदार संघातील निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती यांच्यातच अत्यंत चुरशीची लढत झाली यात जनशक्तीचा विजय झाला. आज पर्यंत केलेल्या कामामुळे गोरगरीब सर्वसामान्य मतदारांनी या निवडणुकीत साथ दिली राज्यातील महायुती शासनाने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनेच्या लाभार्थ्यांनी आशीर्वाद दिले. हा विजय खऱ्या अर्थाने लाडकी बहीणीचा आणि गेली २० वर्ष मेहनत घेतलेल्या कष्ट वेचलेल्या माझ्या सहकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा आहे असे सांगून लोकनेते सूर्य गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना माझा हा विजय समर्पित करतो अशी भावना आ. रमेशआप्पा कराड यांनी व्यक्त केली.