भाजपा कार्यकर्त्यांनी जनसंपर्क अभियानातून
नरेंद्रजी मोदी यांचे कार्य घराघरात पोहोचवावे
लातूर ग्रामीण भाजपा कार्यकर्त्याच्या संवाद कार्यक्रमात ना. अतुल सावे
लातूर दि.१७ – देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असून गोरगरीब सर्वसामान्य माणसाला दिलासा देणाऱ्या अनेक योजना सुरू केल्या आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ दिला. या सर्व कामाची माहिती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून घराघरात पोचवावी असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री ना. अतुलजी सावे यांनी केले.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने देशभर येत्या ३० जून पर्यंत जनसंपर्क अभियान राबविण्यात येत असून यानिमित्ताने शनिवारी लातूर जिल्हा दौऱ्यावर ना. अतुल सावे आले असता त्यांनी आ. रमेशआप्पा कराड यांच्या संवाद कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी उपस्थित लातूर ग्रामीण मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सहकार मंत्री ना. अतुल सावे यांचा लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी श्री पांडुरंगाची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजयजी कौडगे, लातूर जिल्हा प्रभारी प्रा. किरण पाटील, जिल्ह्याचे खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, लोकसभा प्रचार प्रमुख दिलीपराव देशमुख, प्रदेश भाजपाचे अविनाश कोळी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कर्तृत्वामुळे जगात देशाची प्रतिमा उंचावली असून प्रभावशाली काम करीत आहेत. राम मंदिर, कलम ३७० यासह अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सर्वसामान्यांचे जीवनमान बदलण्याचे काम केले. कोरोना लस आणि राशन जनतेला मोफत दिले. शेतकऱ्यासाठी सन्मान योजना, आयुष्यमान भारत, मुद्रा लोन, जल जीवन मिशन, घरकुल, गॅस यासह विविध योजना सुरू करून प्रभावीपणे राबवल्या.
भारत देश जगात एक नंबरचा करण्यासाठी मोदीजींचे प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांना आपली सर्वांची साथ आणि समर्थन हवे आहे यासाठी भाजपाचे जनसंपर्क अभियान यशस्वी झाले पाहिजे ज्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडावी असे सांगून ना. अतुल सावे म्हणाले की राज्यात एकनाथजी शिंदे व देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार प्रभावीपणे काम करीत आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ३५० खासदार निवडून आणण्याचा भाजपाचा संकल्प असून त्यात लातूरचा खासदार निश्चितपणे असला पाहिजे लातूर जिल्ह्यात आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात भाजपाचे संघटन मजबूत आहे भाजपाचे जनसंपर्क अभियान निश्चितपणे यशस्वी होईल यात शंका नाही अशी अपेक्षा ना. अतुल सावे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी पक्षाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.