लातूर : लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. द्वारकादास तापडिया यांची तर सचिवपदी डॉ. शशिकांत कुकाले यांची निवड करण्यात आली आहे.
लातूरच्या अंबेजोगाई रोडवरील कार्निव्हल रिसॉर्ट्स मध्ये बुधवारी रात्री हा पदग्रहण समारोह सोलापूरचे ख्यातनाम अस्थिशल्य चिकित्सक डॉ. शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असो.चे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. प्रकाश शिगेदार , डॉ.अशोक पोद्दार, डॉ.अरुणकुमार राव,डॉ. राजेंद्र मालू,डॉ. गिरीश कोरे, डॉ. राजकुमार दाताळ , डॉ. हाजगुडे यांसह लातूर जिल्हयातील ६२ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. शिवशंकर यांचे मानवी शरीरातील हाडांच्या क्लिष्ट शस्त्रक्रियेविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शन केले.
बदलत्या अद्यावत उपचार प्रणालीचा योग्य उपयोग करून रुग्णांना चांगल्यात चांगली सेवा देणे कसे शक्य आहे, याविषयी त्यांनी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे लातूर येथे अस्थिरोग तज्ञांसाठी विविध प्रकारच्या अस्थिरोगांवरील शस्त्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे,असे आवाहन डॉ. शिवशंकर यांनी केले.
लातूर ऑर्थोपेडिक असोसिएशनचे नूतन अध्यक्ष डॉ. द्वारकादास तापडिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्याने जिल्ह्यात अस्थिरोगांविषयी जनजागृती करणायचे काम प्राधान्याने करणार असल्याचे सांगितले. आरोग्यसेवेसोबतच सामाजिक कार्यावरही आपण सातत्याने भर देणार असून त्याचाच एक भाग म्हणून असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच दि. ७ ऑगस्ट रोजी लातूर येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अपघातानंतर करावयाच्या प्रथमोपचाराविषयीची कार्यशाळा घेतल्याचे नमूद केले. यापुढेही अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण सर्वांना सोबत घेऊन राबविणार असल्याचे डॉ. तापडिया यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार पिंपळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. गिरीश कोरे यांनी केले.
——————-