27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeआंतरराष्ट्रीय*लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट हाऊसफुल्ल!*

*लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट हाऊसफुल्ल!*


दुसऱ्या दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह
महिला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर प्रतिनिधी : सोमवार दि. २७ मार्च २०२३
     पहिल्या लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सोमवारी दुसऱ्यादिवशी सिनेरसिकांची चांगली उपस्थिती होती.मराठीचित्रपटालला तरप्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. ‘गिरकी’ या चित्रपटाला आलेल्याप्रेक्षकांमुळे थिएटरमधील सर्व आसने भरून गेली.   सोमवार दि. २७ मार्च रोजीआज मराठीसह भारतीय भाषा व जागतिक सिनेमा विभागातील असेएकूण आठ चित्रपटदाखविण्यात आले. उद्या मंगळवारी आठ चित्रपट दाखविले जातील. उद्या चित्रपट
महोत्सवाचा समारोप होत आहे.


विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन,महाराष्ट्र शासन वअभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात रविवार पासूनराज्याचे माजी वैद्यकीयशिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या
पुढाकारतून पहिला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल पीव्हीआरथिएटरमध्ये सुरूआहे.

मराठी चित्रपट हाऊसफुल्ल
      कविता दातीर आणि अमित सोनवणे यांनी दिग्दर्शितकेलेलागिरकी हामराठी भाषेतील चित्रपट आज दाखविण्यात आला. या चित्रपटाला रसिकांनी प्रचंड
प्रतिसाद दिला. थिएटर भरल्यामुळे प्रवेश थांबवावा लागला. हाचित्रपटप्रेक्षकांना अतिशय भावला. तशा प्रतिक्रिया नंतर काही प्रेक्षकांनीव्यक्त केल्या. नागरी संस्कृती ते निसर्ग आणि पुन्हा नागरी संस्कृती अशाप्रवासाची ही एक रंजक कहानी होती.

      एक किशोरवयीन मुलगी पॅराग्लायडिंग करताना तांत्रिक बिघाडामुळे एकाजंगलात उतरते. त्या जंगलातून बाहेर पडण्याचे ती खूप प्रयत्न करते. शेवटीथकून गेलेली ती मुलगी एका भग्न आणि निर्जन किल्ल्यात आश्रयाला जाते आणितिथे तिला एक किशोरवयीन मुलगा भेटतो. त्यांची गट्टी जमते आणि हे दोघेही
निसर्गाशी एकरूप होतात आणि शेवटी ते शहरात परत येतात.असे या चित्रपटाचेकथानक होते.

डिर्व्हटीमेंटो’ ने आजच्या दिवसाची सांगता
     ऑर्केस्ट्रा संचालन करणाऱ्या महिलांपैकी एक असलेल्या  झाईया झिओआनीयांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आलेल्याडिर्व्हटीमेंटो’या फ्रेंच भाषेतील चित्रपटाने महोत्सवाच्या आजच्या दिवसाची सांगता झाली.यालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

मंगळवारी आठ चित्रपट
   उद्या मंगळवारी दोन मराठी सह एकूण आठ चित्रपट दाखविण्यात येतील. उद्या’ब्रोकर’ या दक्षिण कोरीयन चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल.चित्रपटमहोत्सवास महिला भगिणीसह, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तप्रतिसाद मिळत असल्याची माहिती श्याम जैन यांनी दिली.
जागतिक विभागातील चित्रपटमध्ये मंगळवारी
‘रिच्यूअल’ (दिग्दर्शक – हँन्स हर्वोस, बेल्जियम, जर्मनी)
‘ब्रोकर'(दिग्दर्शक- हीरोक्जू कोरीदा, दक्षिण कोरिया) हे चित्रपट
उल्लेखनीय आहेत. चित्रपट प्रेमींनी फिल्म फेस्टिवलचा आनंद घ्यावा, असे आवाहन विलासराव देशमुख फाऊंडेशन , अभिजात फिल्म सोसायटी व संयोजकांनी केले आहे.
…….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]