लातूर : महाराष्ट्र राज्यातील नामांकीत बँकेच्या यादीत समाविष्ठ असलेली व बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य असलेली 16 शाखांनी कार्यरत असलेली लातूर अर्बन को-ऑप बँकेस दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि., मुंबई ने सर्वोत्कृष्ट बँक म्हणून पुरस्काराने सन्मानीत केल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रदीप राठी यांनी माहिती दिली.
बँकेची सुरूवात 1995 साली झाली. बँकेने मागील 27 वर्षात ऑडीट वर्ग “अ” प्राप्त केला आहे. बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सर्व नियम, अटी व मापदंडाचा काटेकोरपणे अवलंब करून बँकेचा कारभार करीत आहे.
बँकेने सातत्याने प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे. बँक मागील मार्च २०२०, मार्च २०२१ व मार्च २०२२ अखेर ठेवीमध्ये मागील तीन वर्षात अनुक्रमे रू.४६४.२६ कोटी, रू.५८१.69 कोटी, रू.६७५.६९ कोटी व त्याचप्रमाणे सातत्याने नफ्यामध्ये अनुक्रमे रू.14.09 कोटी, रू.17.29 कोटी व मागील वर्षी रू.22.80 कोटी नफा मिळवला आहे.
मागील दोन वर्षापासून सभासदांना 10% लाभांश (डिव्हीडंट) जाहीर केला आहे. विशेष म्हणजे बँकेने 00% एन.पी.ए. राखण्यात यश मिळवले आहे. हे सर्व बँकेचे यश बँकेचे सभासद, खातेदार, कर्जदार, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्गाने जो विश्वास व आजपर्यंत दिलेली समर्थ साथ यामुळेच शक्य झाले आहे. आम्ही त्यामुळे आपण सर्वांचे ऋणी आहे असे अध्यक्षांनी सांगीतले.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री.आदिनाथ सांगवे, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.वाय.एस.मशायक व उप-मुख्यकार्यकारी अधिकारी श्री.नवनीत भंडारी उपस्थीत होते.