लातूरात 14 फेब्रुवारीपासून श्री श्री अष्टोत्तर शत (१०८)कुंडात्मक अतिरुद्ध महायाग
प.पू. विद्यानंदजी महाराज यांची भागवत कथा
लातूर ,दि.१७ (माध्यम वृत्तसेवा ) -श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग सेवा समितीच्या वतीने दि. 14 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत लातूरमध्ये श्री श्री अष्टोत्तर शत(१०८) कुंडात्मक अतिरुद्र महायाग( यज्ञ )आणि प.पू. विद्यानंदजी महाराज (बाबा )यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.

मानव कल्याण आणि विश्वशांतीसाठी आयोजित या महायाग व भागवत कथेची जय्यत तयारी करण्यात आली आहे .दररोज सकाळी ८ वाजल्यापासून होम हवन आदी धार्मिक विधी आणि सायंकाळी ५ वाजल्यापासून प.पू. विद्यानंदजी महाराज बाबा यांची भागवत कथा होईल .यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत .समितीचे सदस्य हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. यंदाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष हरिप्रसाद मंत्री आहेत. राजीव गांधी चौक रिंग रोड पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात महायाग व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे

. .
भोजन शाळेचे पूजन
या अष्टोत्तर शत कुंडात्मक अतिरुद्र महायोग (यज्ञ )आणि श्रीमद् भागवत कथेच्या कालावधीत दररोज महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यानिमित्त नुकतेच भोजन शाळेचे पूजन करण्यात आले. भोजन समितीचे अध्यक्ष उमेश गारठे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले .याप्रसंगी प.पू. विद्यानंदजी महाराज ,प पू.बालकानंदजी महाराज ,हरिप्रसाद मंत्री, संजय बोरा, राजेश्वर बुके यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
