राज्यस्तरीय जैन वधू-वर मेळाव्याचे आमंत्रण
पालकमंत्री अमित देशमुख यांनी स्वीकारले
लातूर ;दि.( प्रतिनिधी ):-
राज्यस्तरीय जैन वधू – वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटनाचे निमंत्रण पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी स्वीकारले आहे.लातूर येथे मे महिन्यामध्ये होणाऱ्या ३८ व्या राज्यस्तरीय सकल जैन वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन करण्याचे निमंत्रण पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी स्वीकारले आहे. संयोजन समितीच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चाही केली .
तसेच राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याच्या परिचय पत्रकाचे विमोचनही पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले , अशी माहिती स्वागताध्यक्ष राजीव बुबणे यांनी दिली . या राज्यस्तरीय मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून संयोजन समितीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत . या मेळाव्यास राज्यभरातून एक हजार वधू – वर व पालक येणार आहेत.श्री दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळ संचलित जैन वधू-वर सूचक समिती सोलापूर व महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात रविवार दि.१५ मे २०२२ रोजी मुक्ताई मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय ३८ व्या सकल जैन वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .या मेळाव्याचे उद्घाटन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे करणार आहेत. या मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे ,आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह विविध पक्षातील मान्यवर तसेच सकल जैन समाजातील इतर पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे .पालकमंत्री अमित देशमुख यांची स्वागताध्यक्ष राजीव बुबणे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना मेळाव्याचे आमंत्रण दिले तसेच वधु वर परिचय पत्रकाचे विमोचनही त्यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी राजीव बुबणे यांच्यासह सीए सुनील कोचेटा, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे तथा मेळाव्याचे संयोजक किशोर जैन , प्राध्.डॉक्. सुनिता सांगोले ,श्रीमती शोभा कोंडेकर उपस्थित होते.