26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसामाजिक*लातूरच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी आज लातूरकर एकवटणार*

*लातूरच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी आज लातूरकर एकवटणार*

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी

सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांची नेमणूक करावी.

लातूर;दि. ११ ( वृत्तसेवा) -लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील कन्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे हिचा पुणे येथे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला आणि त्यानंतरही आरोपींच्या वतीने तिच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागण्यात येत होती. या अतिशय अमानुष खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांची नेमणूक करून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात येणार असून लातूरकरांनी आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन विविध संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

मूळ लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील भाग्यश्री सूर्यकांत सुडे हि शिक्षणाच्या निमित्ताने पुणे येथे रहीवसास होती. दिनांक ३० मार्च रोजी तिचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. आरोपींनी तिची हत्या करण्यापूर्वीच अहमदनगर जवळील सूपा परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी तिला पुरण्यासाठी खड्डा खोदून ठेवला होता. त्यापुढे जावून खुनानंतर पाच दिवस कुटुंबीयांना खंडणी मागण्यात येत होती.  माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून यामुळे समस्त पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. भविष्यात तरी अशा घटना घडू नयेत आणि मयत भाग्यश्री सुडे हिला न्याय मिळावा यासाठी आज लातूरकर डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे सकाळी ९ वाजता लातूर मधील नागरिक, विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित येवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्याय मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय आणि समारोप डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे याचा समारोप होणार आहे. यानंतर निवडक महिला आणि मुली जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर करणार आहेत.

भाग्यश्री सुडे हीचा अपहरण आणि खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तसेच याकरिता ॲड उज्ज्वल निकम आणि इतर निष्णात वकिलांची नेमणूक करण्यात यावी आणि दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी पोलिस विभागाच्या वतीने चार्ज शीट दाखल करताना कुठलीही पळवाट राहू नये अशा मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून यात सर्व स्तरातील नागरिक सहभागी होणार आहेत. आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन विविध संस्था आणि संघटना यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]