धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते अजय गायकवाड यांचा सत्कार
लातूर : भारताच्या ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूरचे सुपुत्र, युवा गिर्यारोहक श्री. अजय गायकवाड यांनी ७५ फूट तिरंगा ध्वज आफ्रिका खंडातील किलीमांजारो या सर्वांत उंच शिखरावर फडकवला. अनंत अडचणींचा सामना करीत केलेल्या या अभिमानास्पद कामगिरीची दखल घेऊन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी श्री. गायकवाड यांचा सत्कार केला व शाबासकीची थाप दिली.
बाभळगाव येथे मंगळवारी (ता. २७) हा सत्कार संपन्न झाला. यावेळी विलास साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. रवींद्र काळे, काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष श्री. सुभाष घोडके, श्री. मनोज पाटील, श्री. गणेश देशमुख, रयत प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रामदास काळे, श्री. सूर्यकांत लोखंडे, डॉ. शिवानी अष्टूरे, डॉ. अनुजा सरवदे, डॉ. प्रगती शिंदे, श्री. गणेश बोनवळे, श्री. प्रकाश पाटील, श्री. सतिश हाके, श्री. सुरज कुरुलेकर आदी उपस्थित होते.
शिक्षण, सहकार, शेती, कला, उद्योग अशा विविध क्षेत्रात लातूरने आजवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता गिर्यारोहण क्षेत्रातही लातूर चमकत आहे. म्हणून गायकवाड यांचा सत्कार करताना विशेष आनंद वाटला, अशी भावना व्यक्त करून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी गिर्यारोहण क्षेत्रातील पुढील मोहिमांसाठी श्री. गायकवाड यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.—चौकट :नवी ऊर्जा देणारा क्षण
लातूरमध्ये गिर्यारोहण क्षेत्रात तरुणाई पुढे येत आहे. पण, त्यांची दखल इतर शहरात ज्या पद्धतीने होते, तशी आपल्या भागात होत नाही. पण, आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी स्वतःहून आमची दखल घेतली. भेटायला बोलावले. सत्कार केला. लातूरचे नाव आणखी मोठे करा, अशी शाबासकी दिली. ही आमच्यासाठी खूप मोठी बाब आहे. हा सत्कार कायम नवी ऊर्जा व नवे बळ देत राहील, अशी भावना गिर्यारोहक श्री. अजय गायकवाड यांनी व्यक्त केली.-