16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसांस्कृतिकलातूरच्‍या परंपरेला साजेसा सामूदायिक दसरा महोत्सव साजरा

लातूरच्‍या परंपरेला साजेसा सामूदायिक दसरा महोत्सव साजरा


शोभा मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले; शस्‍त्र पुजन, उल्‍लेखनिय कार्य केलेल्‍यांचा गौरव

लातूर दि.१४-( माध्यम वृत्तसेवा):– अनेक वर्षापासून परंपरा असलेल्या लातूर येथील सामूदायिक दसरा महोत्सव समितीच्‍या वतीने याहीवर्षी भव्‍यदिव्‍य शोभा मिरवणुक काढून विजयादशमी उत्‍सव साजरा करण्‍यात आला. या मिरवणुकीत विविध ढोलताशा पथक, लेझीम पथक, धर्मरक्षक घोडेस्‍वार, उंटस्‍वार, भगवे ध्‍वज रक्षक, धनगरी ढोल पथक, अकलूजचे हालगी पथक यांच्‍यासह लाठी काठी, दोरी मलखांब, कराटे आदी कवायती करणारे पथक वाद्यवृंदासह सहभागी झाले होते.

या ऐतिहासीक शोभा यात्रेने संपूर्ण लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. दसरा महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पंरपरा आणि संस्‍कृतीचे दर्शन घडवीत लातूरला साजेसा असा दसरा महोत्सव मोठ्या उत्साहाच्या आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा झाला.


सामुदायिक दसरा महोत्‍सव समितीच्या वतीने अत्यंत सुरेख नियोजन करून संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केले. आर्य समाज, गांधी चौक लातूर येथे स्‍वागताध्‍यक्ष आ. रमेशआप्पा कराड आणि डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या शुभहस्ते ध्‍वजारोहन व शस्त्र आणि चारवेद शास्‍त्र पूजन करुन शोभायात्रेस प्रारंभ करण्‍यात आला. तत्‍पुर्वी महर्षी दयानंद व्‍यायाम व क्रिडा मंडळ यांच्‍या वतीने लातूर शहर आणि परिसरातील समाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्‍कृतिक क्षेत्रात तसेच सनातन वैदीक हिंदू धर्म संस्‍कृती रक्षणासाठी उल्‍लेखनिय कार्य केलेल्‍या व्यक्तींचा संस्‍था प‍दाधिकारी यांचा महर्षी दयानंद रक्षक पुरस्‍कार देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी आ. रमेशआप्पा कराड हे होते तर या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्‍हणून भाजपा नेत्‍या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, व्‍यापारी महासंघाचे अध्‍यक्ष रामदास भोसले, गुरुकूल विद्यालयाचे गोपाळ नाईक, आर्य समाज प्रधान ओम प्रकाश पाराशर, शंकरराव मोरे, सामुदायिक दसरा महोत्‍वस समितीचे जयप्रकाश दगडे, ईश्‍वर बाहेती, प्रदिप पाटील खंडापूरकर, व्‍यंकटेश हालिंगे, संतोष तोष्‍णीवाल, अमोल नानजकर, राणी स्‍वामी, विष्‍णु भुतडा आदिंची प्रमुख उपस्थिती होती.


आर्य समाज येथून सायंकाळी निघालेल्या शोभा मिरवणुकीत ढोलताशा पथक, ओडीयाराज ग्रूपचे लेझीम पथक, धर्मरक्षक घोडेस्‍वार, उंटस्‍वार, धर्मध्‍वजा धारण करणा-या शंभर युवती, भगवे ध्‍वज रक्षक, अंकोली येथील धनगरी ढोल पथक, अकलूजचे हालगी पथक, जनजागृती गुरुकूल विद्यालयाचे युवक युवती यांच्‍या कवायती, सुर्यनमस्‍कार, लाठी काठी, दोरी मलखांब, कराटे, लाकडी मलखांब, तलवारबाजी, आदींचे चित्‍तथरारक प्रा‍त्‍याक्षिके लातूरकरांचे लक्ष वेधून घेत होते.

सिध्‍देश्‍वर व्‍यायम संघाचे अध्‍यक्ष सुरज व्‍यवहारे, संभाजी कांबळे यांच्‍या नेतृत्‍वातील दोनशे मुला मुलींनी संगीताच्‍या धुनवर अतिशय सुरेख प्रात्‍यक्षिके सादर केली. यशवंत विद्यालयातील महावीर काळे, दिलीप कानगुले यांच्‍या शंभर विद्यार्थ्‍यांच्‍या पथकाने प्रभु श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्‍मण व हनुमानाचा देखावा सादर केला होता. हिंदू धर्माचे रक्षण करण्‍यासाठी गीतरामाणाची संगीत धुनसह रथातून मार्गस्‍थ होत होते. बळीभाऊ बॅड यांच्‍या रथात पाच पांडव, युधीष्‍ठीर, अर्जुन, भिम, नकुल, सहदेव आणि द्रोपदी, माता कुंती यांचा देखावा होता. या शोभायात्रेत चंद्रशेवर शास्‍त्री वेद मंत्रोपचार करत होते, सोमदेव शास्‍त्री, प्रकाशवीर शास्‍त्री, अशोक पवार, वैजनाथ हालिंगे आदी वैदीक पुरोहीत यज्ञ हवन करत पर्यावरणाचा संदेश मिरवणूकीतून दिला.

या मिरवणुकीत लातूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक महिला पुरुष तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या शोभायात्रेत स्वागताध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, भाजपा नेत्‍या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, शहर अध्यक्ष ईश्वर बाहेती यांच्‍यासह इतर अनंकांनी फुलांनी सजवलेल्‍या उघड्या जीपमधून जनतेला विजयादशमीच्या निमित्ताने हात उंचावून शुभेच्छा दिल्या. एकूणच लातूर शहरात सामूहिक दसरा महोत्सवाची प्रचंड उत्साहाच्या वातावरणात निघालेली शोभा मिरवणूक ऐतिहासिक ठरली.
यशवंत शाळेच्या मैदानावर फटाक्याची आतिषबाजी करून विविध कलापथकांनी आपली कला सादर करून शोभा मिरवणुकीचा समारोप झाला.

याप्रसंगी आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍यासह अनेक मान्‍यवरांनी विजयादशमीच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या. समारोप कार्यक्रमात छोटू हिबारे यांच्‍या स्‍वरांजली संगीत ग्रूपच्‍या वतीने देशभक्‍ती, राष्‍ट्रीय, धार्मिक, सांस्‍कृतिक गितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमचाचे सुत्र संचलन विष्‍णु भुतडा, व्‍यंकटेश हालिंगे यांनी केले तर शेवटी दिलीप कानगुले यांनी आभार मानले.

सामूहिक दसरा महोत्सव यशस्वी व्हावा यासाठी समितीच्या वतीने हुकुमचंद कलंत्री, धर्मवीर भारती, प्रकाश कासट, रामदास भोसले, श्रीकांत रांजणकर, संतोष तोष्णीवाल, वैजनाथआप्पा लातूरे, विजयकुमार सलगरे, महावीर काळे, गोपाळ बुरबुरे, ओमप्रकाश गोपे, सुरज व्यवहारे, महादेव खंडागळे, हनुमंत कोळेकर नितीन मोहनाळे, शिवराज पानगावे, अभिषेक पतंगे, संजय जमदाडे, राधिका पाटील, मनीषा बोळशेट्टी, योगिता ठाकूर, बाबासाहेब सूर्यवंशी, काशाबाई हांडे, जयश्री भुतेकर, रेखा खंदाडे, सुवर्णा नाईक, शितल तमलवाड, प्रिती कोळी, आकाश गडगळे, लक्ष्मण शिंदे, संदीप पुणेकर, तुषार रेड्डी, विनोद रेड्डी, श्रावण रावणकुळे, यांच्यासह अनेकांनी मेहनत घेतली. दसरा महोत्‍सव उत्‍सवात सामाजिक, राजकीय, उद्योजक, व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, तरुण, महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]