30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी माझा लातूर परिवार पुढाकार घेणार*

*लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी माझा लातूर परिवार पुढाकार घेणार*


लातूर, दि.७ (प्रतिनिधी) – पंधरा वर्षापासून लातूर शहरांमध्ये लातूर जिल्ह्यातील जनतेसाठी आरोग्य सुविधा म्हणून महत्त्वाचे असणारे जिल्हा रुग्णालय अस्तित्वात नाही, केवळ जागेच्या समस्येमुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. लातूरला जिल्हा रुग्णालय अस्तित्वात यावे यासाठी माझं लातूर परिवाराची खूप मोठी तळमळ आहे. आगामी काळात यासाठी माझं लातूर परिवाराचे सदस्य म्हणून आम्ही पुढाकार घेऊ, अशी भूमिका डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांनी माझं लातूर परिवार आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केली.


सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून या माध्यमातून सामाजिक कार्य देखील करता येते. याचे मूर्तीमंत उदाहरण लातूर जिल्ह्यातील माझं लातूर व्हाट्सअप ग्रुप ठरला आहे. कोविड कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेल्या या ग्रुपने या काळात रुग्णांना बेड, आरोग्य सुविधा मिळणे, प्रशासकीय समन्वय यासोबत रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन हे कार्य केले. तसेच विविध क्षेत्रातील कार्यामध्ये हा ग्रुप अग्रेसर आहे, नेत्र शिबीर, आषाढी ची मोफत वारी या सारखे कामे माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आली त्याचे सर्वत्र कौतुक झाले.


या माझं लातूर परिवाराच्या सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वतीने आज लातूर येथे करण्यात आली. लातूर शहरातील टिळक नगर परिसरात असणाNया यशवंतराव चव्हाण शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये यासाठी पेंडॉल उभारण्यात आला होता. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करून करण्यात आले. यावेळी डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, अ‍ॅड. बळवंत जाधव यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी माझं लातूर परिवाराच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं.
या शिबिरामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने विविध आरोग्य चाचण्या मोफतरित्या करण्यात आल्या. समाजातील सर्वांनी वयाच्या ४० शी नंतर आपल्या विविध आरोग्य तपासण्या केल्या तर त्याचा वेळीच फायदा होतो आणि पुढील आरोग्य समस्या वेळात दुरुस्त होण्यास मदत होते. जनतेने आरोग्याबाबत सतर्क रहावे हा या शिबिराचा उद्देश असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख यावेळी म्हणाले. माझं लातूर परिवाराच्या सदस्यांच्या आणि कुटुंबीयांच्या मोफत तपासण्या यावेळी करण्यात आल्या, शिबिराला माझं लातूर परिवाराच्या सदस्यांनी मोठा प्रतिसाद दिला.


याप्रसंगी माझं लातूर परिवाराचे सतिष तांदळे, अभय मिरजकर, दिपरत्न निलंगेकर, प्रमोद गुडे, प्रदिप मोरे, काशीनाथ बळवंते, सितम सोनवणे, विष्णू साबदे, राजेश तांदळे, गोपाळ झंवर, राजकूमार सोनी, तम्मा पावले, संजय स्वामी, परिवारातील सदस्य उपस्थित होते.
फोटो. ६) मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगीचे छायाचित्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]