मुंबई ; दि.१०(विशेष प्रतिनिधी)-लातूरचे लोकप्रिय माजी खासदार संसद रत्न प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना “द जॉर्ज वॉशिंग्टन यूनिवर्सिटी ऑफ पीस” फ्लोरिडा यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ने “डॉक्टरेट इन पॉलिटिकल सायन्स” या पी.एचडी (ऑनर्स) नी नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला.
भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी विशेष कार्यक्रमा मधे ही मानाची ऑनर्स पी.एचडी. पॉलिटिकल साइंस ची डिग्री देऊन डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी राजकीय,सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरी ची दखल घेऊन गौरव करण्यात आला.
दादासाहेब फाळके फिल्म अवार्ड चे चेअरमन तथा गरिबोंके ऐक्टर कल्याणजी जाणा यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.

प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड हे १६ व्या लोकसभेत हायली एज्युकेटेड मेंबर ऑफ पार्लियामेंट हा हाईरेंज वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड अवार्ड या पूर्वी ही मिळाला आहे.अनेक पुरस्काराचे मानकरी असलेले डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी खासदार की च्या काळात अनेक विकास कामे केली. प्रामुख्याने सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,नीट परीक्षा केंद्र,पासपोर्ट सेवा केंद्र,लातूर शहरात सुलभ शौच्यालय,शहरात बसस्टॉप शेड,पाणी टंचाई काळात लातूर शहरात १०० बोअर वेल पाण्यासाठी करून दिले,अनेक नवीन रेल्वे सुरु केल्या, रत्नागिरी नागपूर हाईवे, पोस्टाचे विभागीय कार्यालय,रेल्वे नी लातूर ला पाणी आणले, रेल्वे बोगी कारखाना सुरू केला,हजारो रुग्णांना प्रधानमंत्री कडून आर्थिक मदत मिळवून दिली, हजारो वृद्ध कलाकाराना पेन्शन सुरू करुन दिले, लोकसभा मतदार संघातील जवळपास ६०० गावात खासदार निधी चे वितरण केले आणि २५ कोटी निधी चे वाटप केले, लोकसभेत मतदार संघातील अनेक प्रश्र्न सभागृहात मांडले, अनेक कायद्यावर संसदेत मत मांडले, संसदेत १००% उपस्थिती. अशा अनेक कामाची दखल घेऊन डॉक्टरेट इन पॉलिटिकल सायन्स ही पी.एचडी देऊन अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील द जॉर्ज वॉशिंग्टन यूनिवर्सिटी ऑफ पीस” फ्लोरिडा यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ने “डॉक्टरेट इन पॉलिटिकल सायन्स” या पी.एचडी (ऑनर्स) नी नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला.
त्यांच्या या गौरवाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.