लातूरची मुलगी घेणार अमेरिकेत शिक्षण

0
314

कॉक्सिटची स्मिता ढोके घेणार अमेरिकेतल्या मॅसाच्युसेट्स विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण

लातूर,दि.८ – येथील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) बीएस्सी. सीएसमधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी स्मिता प्रल्हादराव ढोके हिला पुढील एम. एस. संगणकशास्त्र या पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेच्या नॉर्थ बोस्टन येथील मॅसाच्यूसेट्स विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. परदेशातील नामांकित विद्यापीठात शिक्षणासाठी गेलेली ती कॉक्सिटची पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.

येथील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयात (कॉक्सिट) रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थाध्यक्ष अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकशास्त्रातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देण्यात येते. महाविद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांना आजपर्यंत विविध नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकर्‍या मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून विविध कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखती महाविद्यालयात होतात.

महाविद्यालयाच्या स्मिता प्रल्हादराव ढोके या विद्यार्थिनीने कॉक्सिटमधून नुकतीच बी. एस्सी. सीएसची पदवी पूर्ण केली. यात तिला ७३ टक्के गुण मिळाले. पुढील शिक्षणासाठी तिने अमेरिकेतील नॉर्थ बोस्टन राज्यातील मॅसाच्युसेट्स विद्यापीठात जाण्याचे ठरवले. त्यासाठी आवश्यक असणारी पूर्व परीक्षा ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. यामुळे तिला एम. एस. संगणकशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी संधी मिळाली आहे.

स्मिता ढोके हिच्या या यशाबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपप्राचार्य आर. डी. सोमवंशी, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. कैलास जाधव, अधीक्षक संतोष कांबळे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here