लातूर येथील शैलेश शेळके ठरला
महाराष्ट्र कुस्ती महा-वीर किताबाचा मानकरी
लातूर, दि १४ : लातूरच्या औसा येथील टाका गावाचे शैलेश शेळके याने सोलापूरच्या कालीचरण सोलंकर याला सहा-चार अशा गुणांनी पराभव करुन महाराष्ट्र कुस्ती महा-वीर हा खुल्या गटातील किताब मिळविला. रुपये १,००,०००/- रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धा गेल्या १५ वर्षापासून भरविण्यात येत आहेत. सोलापूर येथील कालीचरण सोलंकर यांनी उपविजेते पद मिळविले. त्यांना रौप्यपदक व रोख रुपये ७५,०००/- चे पारितोषिक देण्यात आले. रामेश्वर (रूई) येथील भरत कराड याला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याला रुपये ५०,०००/- रोख व कांस्य पदक, देण्यात आले. चतुर्थ क्रमांकावर सोलापूर येथील याला अजय खरात रुपये २५,०००/- रोख व पदक देण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण २४४ मल्लांनी भाग घेतला होता.
हिंद केसरी दीनानाथ सिंग, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, रामेश्वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, आमदार श्री. रमेशअप्पा कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, डॉ. हनुमंत कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, श्री. राजेश कराड, डॉ. पी.जी.धनवे व वस्ताद पै. निखिल वणवे यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
इतर वजन गटातील विजेते पुढीलप्रमाणे
(प्रथम क्रमांक – सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक व रोख रक्कम पुढे दिल्या प्रमाणे)
वजन गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक
८६ किलो गौरव हजारे प्रदीप काळे विश्वचरण सोलणकर. परमेश्वर गाढे
रक्कम रु. ४०,०००/- रु. ३०,०००/- रु.२५,०००/- रु.२०,०००/-
७४ किलो विकास शेंडगे विष्णु तातपुरे आकाश देशमुख अक्षय हिरगुडे
रक्कम रु.२५,०००/- रु.२०,०००/- रु.१५,०००/- रु.१०,०००/-
७० किलो देवानंद पवार सद्दाम शेख सुमित गुजर कुलदीप पाटील
रक्कम रु.१५,०००/- रु.१२,०००/- रु.१०,०००/- रु.८,०००/-
६५ किलो अनुदान चव्हाण सुशांत देशमुख विकी करे महेश तानपुरे
रक्कम रु.१२,०००/- रु.१०,०००/- रु.८,०००/- रु.५,०००/-
६१ किलो विजय डोंगरे निखिल पवार विनोद कामाळे दयानंद सलगर
रक्कम रु.१०,०००/- रु.७,०००/- रु.५,०००/- रु.३,०००/-
५७ किलो निनाद बडरे आकाश गड्डे सिद्धाराम कारभारी पंकज मुज्जे
रक्कम रु.७,०००/- रु.५,०००/- रु.३,०००/- रु.२,०००/-
७५ पेक्षा अधिक वर्षे वय असलेले अनेक मल्ल सहभागी झाले होते. त्यापैकी शिवाजी मोरे हे प्रथम व विक्रम नलावडे द्वितीय या पैलवानांचा योग महर्षी स्वातंत्र्यसेनानी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलार मामा स्मृती-सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, रामेश्वरच्या मातीतून आज ना उद्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू निर्माण होतील. भारताच्या कुस्तीक्षेत्रामध्ये आपले नाव उज्वल करतील. कुस्ती या क्रीडाप्रकारात आपले मन आणि मनगट मजबूत होते. आजच्या तरुणांनी कुस्तीकडे वळणे गरजेचे आहे.श्री. बाबा निम्हण यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन व धावते वर्णन केले. तर प्रा. डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.