26.8 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeमनोरंजन*लातूरकरांसाठी नाट्य पर्वणी*

*लातूरकरांसाठी नाट्य पर्वणी*

पुढील पिढीवर नाट्य संस्कार व्हावेत,. त्यांना नाटक म्हणजे काय कळावे आणि शहरात बालनाट्य चळवळ वाढावी या उद्देशाने कलोपासक मंडळ, लातूर यांनी बालनाट्य महोत्सव २०२२-२३ याचे आयोजन दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी रविवारी दगडोजीराव देशमुख सभागृह येथे केले आहे.

३ सत्रात चालणाऱ्या या महोत्सवात शहरातील केशवराज विद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, जनकल्याण निवासी विद्यालय, राजानारायणलाल लाहोटी इंग्लीश विद्यालय, श्री श्री रवीशंकर विद्यालय, सरस्वती विद्यालय, संवेदना सेरेबरल पाल्सी विकसन केंद्र, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, ज्ञानेश्वर विद्यालय अशा नऊ मान्यवर शाळांचे संघ सहभागी होत आहेत. यात दर्जेदार नाटकांचा समावेश असून सुमारे १२५ बालकलाकार आपली नाट्य कला लातूरकरांसमोर सादर करणार आहेत.

पहिले सत्र ९.३० ते १२.३०
दुसरे सत्र १.०० ते ४.००
तिसरे सत्र ४.३० ते ७.३०

प्रत्येक सत्रात ३ शाळांची नाटके सादर होतील.

या महोत्सवाच्या निमित्ताने विविध शाळेतील विद्यार्थ्यांना बालनाट्यासाठी एकत्रित रंगमंच उपलब्ध करून देण्याचे कार्य कलोपासक मंडळ करत आहे. यातून शालेय विश्वात बालनाट्याची संस्कृती रुजून शहरातील सर्वच शाळांत बालनाट्य सादरीकरण पुन्हा सुरू होईल अशी मला खात्री आहे.

तरी या महोत्सवाला आपल्या लातूर शहरातील नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांनी आपल्या परिवारासह उपस्थिती नोंदवून बालनाट्य स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन मी सर्वांना करतो आहे.


लातूरात रंगणार बाल नाट्य महोत्सव
लातूर : शालेय विद्यार्थ्यांवर बालवयापासून नाट्यसंस्कार व्हावेत यासाठी कलोपासक नाट्य मंडळातर्फे दि.१२ फेब्रुवारी २०२३ (रविवार) रोजी दिवसभराचा बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षात बालकांमधील नाट्यसंस्कार लोप पावत आहे. त्यामुळे पुढील पिढीत नाटकाची उत्तम जाण असणारा सुजाण प्रेक्षक वर्ग काही वर्षांनी बघायला मिळणार नाही. ही परिस्थिती बदलण्याकरिता कलोपासक मंडळ यावर्षीपासून बाल नाट्य एकांकिका महोत्सव आयोजित करीत आहे.
सन २०२२-२३ या वर्षासाठीचा बालनाट्य महोत्सव दि. १२ फेब्रुवारी २०२३ (रविवार) रोजी दगडोजीराव देशमुख सभागृह, लातूर येथे संपन्न होत आहे. सुमारे १० तास आणि तीन सत्रात चालणार्‍या या महोत्सवात शहरातील केशवराज विद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, जनकल्याण निवासी विद्यालय, राजानारायणलाल लाहोटी इंग्लीश विद्यालय, श्री श्री रवीशंकर विद्यालय, सरस्वती विद्यालय, संवेदना सेरेबरल पाल्सी विकसन केंद्र, ज्ञानप्रकाश विद्यालय, ज्ञानेश्वर विद्यालय अशा नऊ मान्यवर शाळांचे संघ सहभागी होत आहेत. यात सुमारे १०० बालकलाकार आपली नाट्य कला लातूरकरांसमोर सादर करणार आहेत.
या महोत्सवाच्या निमित्ताने विविध शाळेतील विद्यार्थ्यांना बालनाट्यासाठी एकत्रित रंगमंच उपलब्ध करून देण्याचे कार्य कलोपासक मंडळ करत आहे. यातून शालेय विश्वात बालनाट्याची संस्कृती रुजून शहरातील सर्वच शाळांत बालनाट्य सादरीकरण पुन्हा सुरू होईल. तरी या महोत्सवाला शहरातील नागरिक, इतर शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांनी उपस्थिती नोंदवून बाल कलाकारांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन कलोपासक मंडळाच्या बालनाट्य महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.

कलोपासक नाट्यमंडळ
लातूर शहरामध्ये १९५६ पासून नाट्यकलाविषयक आवड आणि विचार रुजवणारे, सर्वात जुने नाट्यमंडळ म्हणजे कलोपासक मंडळ. लातूरातील स्थानिक कलावंतांना घेऊन नाटकं सादर करणे, प्रथितयश व्यावसायिक नाटकांचे प्रयोग, विविध कला, शास्त्रीय संगीत व नृत्याचे कार्यक्रम लातूरात आयोजित करणे आणि त्या माध्यमातून लोकांमध्ये कला रुची वाढवण्याचे कार्य मंडळ गेली सात दशके अव्याहतपणे करत आहे. एकेकाळी कलोपासक ने आपल्या आगळ्या वेगळ्या कलाकृतींमुळे महाराष्ट्रभर लातूरचा दबदबा निर्माण केला होता. मुंबईत राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत मंडळाचे नाटक बघण्यासाठी मान्यवर कलावंत आवर्जून उपस्थित राहत असत. आजही सात दशकांपासून हौशी रंगभूमीसाठी सातत्याने योगदान देणार्‍या महाराष्ट्रातील मोजक्या संस्थामध्ये कलोपासक नाट्य मंडळाची गणना होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]