डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं अशावेळी शक्यतो प्रवास टाळावा
कुटुंबीयांपासून दूर राहावं
डोळ्यांना हात लावू नये
वेगळा रुमाल वापरावा
तेलकट खाणं टाळावं
काहीही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यांचा संसर्ग होऊ नये या करिता प्रतिबंधक आयुर्वेदिक उपाय @लड्डा आयुर्वेद त्रिफळा चूर्ण ही औषधी वनस्पती असून डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते. त्रिफळा चूर्ण (विना मिठाचे) घातलेल्या पाण्याने डोळे धुणे देखील फायदेशीर आहे. रोज करा ‘हे’ काम त्रिफळा चूर्णाने डोळे कसे धुवावेत? १० ग्रॅम त्रिफळा चूर्ण घ्या. हे २५० मिली पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी १० मिनिटे उकळून गाळून घ्या. या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. या काळात दिवसातून दोन वेळा हा उपक्रम केला तरी चालते. @लड्डा आयुर्वेद त्रिफळाने डोळे धुण्याचे फायदे आयुर्वेदनुसार, त्रिफळाने नियमित डोळे धुतल्याने डोळ्यांचा संसर्ग किंवा इतर डोळ्यांसंबंधित विकार दूर होतात आणि डोळ्यांची सूज, वेदना, लालसरपणा आणि खाज कमी होते. यामुळे दृष्टीही सुधारू शकते. दरम्यान डोळ्यांचा संसर्ग वाढत असल्याचे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येत आहे.