– अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा इशारा
लातूर दि.17-04-2022
दरवर्षी लातूरकरांना उन्हाळ्यामध्ये दूष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागते. पंरतु या वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे पाणी मिळत आहे. परंतु ते दूषित पाणी आहे. महापौराच्या दृष्टितून ते पाणी पिण्यायोग्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांवर विनाकारण दूषित पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे खबरदार लातूरकरांना तात्काळ स्वच्छ पाणी द्या अन्यथा आगामी काळात स्वच्छ पाण्याच्या नावाखाली पूरवठा केले जाणारे ते दूषित पाणी जनताच सत्ताधार्यांना पाजेल. असा ईशारा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी दिलेला आहे.
आधीच लातूरकरांच्या पाचवीला दुष्काळ पूजलेला आहे. त्यातच स्वच्छ पाणी मिळत नाही हे नवीन नाही.
लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सत्ता येताच उजनीचे पाणी आणू असे आश्वासन देवून निवडून आले. परंतु त्यांनी उजनीच्या पाण्याच्या आश्वासनाची परीपूर्ती मात्र केली नाही. हे वास्तव आहे. त्याच भर उन्हाळ्यात नागरिकांना आहे त्या पाणीसाठ्यातून दूषित व रंगीत पाणीपुरवठा केला जात आहे. या बाबत नागरिकांनी मनपाकडे तक्रारी करूनही लातूर महानगरपालिका प्रशासन मात्र ते पाणी पिण्योयोग व शुद्ध आहे याची खात्री देत आहेत. परंतु लातूरकरांवर मात्र भर उन्हाळ्यात दूषित पिवळे व काळे पाणी पिण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेतील सत्ताधार्यांनी नागरिकांसाठी तात्काळ शुध्द पाण्याचे नियोजन करावे, अन्यथा येणार्या काळात तीव्र परिणामांना सामोरे जावे लागेल असा ईशाराही त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.
अन्यथा पालकमंत्र्यांना रंगीत पाण्याच्या बाटल्या पाठवू
लातूरला सदैव दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागलेले आहे. यावर्षी पाण्याची परिस्थिती बरी असतानाही शुध्द पाणी पुुरवठा लातूर महानगरपालिकेकडून केला जात नाही. टंचाईच्या काळात रेल्वेद्वारे बाहेरून पाणी पुरवठा होत असतानाही असे रंगीबेरंगी पाणी पिण्याची वेळ लातूरकरांवर कधीही आलेली नव्हती. मग आताच असा दूषीत पाणी पूरवठा का केला जात आहे? याची तात्काळ दखल घ्या अन्यथा सदरील रंगीत पिवळे पाणी व काळे पाणी भरलेल्या बाटल्या लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठविल्या जातील असा ईशारा नगरसेवक अजितससिंह पाटील कव्हेकर यांनी दिलेला आहे.
——————————————————-