*स्वागताध्यक्ष राजीव बुबणे
लातूर ; दि १८( प्रतिनिधी)
श्री दिगंबर जैन सैतवाळ सेवा मंडळ संचलित जैन वधू – वर सूचक समिती सोलापूर व महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातुरात ३८ वा राज्यस्तरीय सकल जैन वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे . रविवार दि.१५मे २०२०२ रोजी मुक्ताई मंगल कार्यालय येथे आयोजित या राज्यस्तरीय मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे , आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह विविध पक्षातील मान्यवर तसेच सकल जैन समाजातील इतर पदाधिकारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष राजीव बुबणे यांनी दिली. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी व यशस्वीतेसाठी सोलापूर, पुणे व लातूर जिल्ह्याची कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्याची कार्यकारीणी याप्रमाणे : राजीव बुबणे – स्वागताध्यक्ष , किशोर जैन, डॉ. पी.पी. शहा , मनोज रामढवे, महावीर बोपलकर,महेंद्र दुरुगकर ,प्रमोद जयगावकर,अजय कस्तुरे, प्रा.डॉ. सुनिता सांगोले , संतोष पांगळ, श्रीमती शोभा कोंडेकर, किरण देशमाने (सर्वजण सदस्य ) . लातूरात आयोजित या राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
१५ मे २०२२ रोजी अंबाजोगाई रस्त्यावरील मुक्ताई मंगल कार्यालयात सकाळी ९ते दुपारी ५ वाजेपर्यंत हा मेळावा होईल. मेळाव्यामध्ये सकल जैन समाजातील सर्व जाती उपजाती यांना प्रवेश खुला असेल .या मेळाव्यास जवळपास एक हजार वधू -वर व पालक उपस्थित राहणार आहेत , अशी माहिती स्वागताध्यक्ष राजीव बुबणे यांनी दिली.