18.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*लातुरात काँग्रेसचा सत्याग्रह*

*लातुरात काँग्रेसचा सत्याग्रह*

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून होत असलेल्या दडपशाहीच्या 

विरोधात लातूरात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

केंद्रशासनाला सामान्य जनतेला त्रासदायक ठरणारी 

धोरणे बदलण्यास भाग पाडले जाईल

 माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख 

लातूर प्रतिनिधी २६ जूलै २०२२ : 

 देशातील जनता आणि विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे ही निषेधार्य बाब आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने काँग्रेस पक्षाने राहुलजी गांधी नेतृत्वात देशभरात आंदोलन उभे केले असून या माध्यमातून  सामान्य जनतेला त्रासदायक ठरणारी धोरणे बदलण्यास केंद्र शासनाला भाग पाडले जाईल असे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. 

 काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना इडीमार्फत वारंवार चौकशीला बोलावून नाहक त्रास देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या या दडपशाहीच्या विरोधात लातूर शहर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर शहरातील व्यापारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरात सत्याग्रह आंदोलन आयोजित केले होते. या आंदोलनात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी केंद्रसरकारच्या विरोधात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

  काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठीमागे केंद्रातील मोदी सरकारने इडीची चौकशी लावली आहे. या अगोदर काँग्रेस नेते राहूल गांधी यांचीही इडीने अनेक वेळा चौकशी केली आहे फक्त काँग्रेस पक्षाच्याच नव्हे तर सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रिय यंत्रणा मार्फत चौकशी लावून त्यांना त्रास दिला जात आहे. देशात वाढलेली बेरोजगारी आणि महागाई विरोधात आवाज उठवू नये म्हणून केंद्र शासनाने हे दडपशाहीचे धोरण अवलंबलें आहे असेही आमदार अमित देशमुख यांनी योवळी म्हटले. महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या मार्गांनी आंदोलन करून इंग्रजांची जूलमी रातजवट उलथवून टाकली देशाला स्वातंत्र मिळवून दिले. त्याच पध्दतीने केंद्रातील सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आता काँग्रेस पक्षाने राहूल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता केंद्रशासनाला आपली धोरणे बदलणे भाग पडणार आहे असेही आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.  

  यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त करून केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

   यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, ट्वेंटीवन शुगर कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोइज शेख, सचिव अभय साळुंके, गोरोबा लोखंडे चेअरमन सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, इम्रान सय्यद, युनूस मोमीन, रविशंकर जाधव, धनंजय शेळके, जीवन सुरूवसे, सुपर्ण जगताप, हंसराज जाधव, पुनीत पाटील, प्रा. प्रवीण कांबळे विजयकुमार साबदे, आयुब मनियार, पृथ्वीराज शिरसाट, ज्ञानेश्वर सागावे, एकनाथ पाटील, सचिन गंगावणे,मोहन सुरवसे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, ॲड. फारुख शेख, माजी महापौर स्मिता खानापुरे, सपना किसवे, स्वाती जाधव, वर्षा मस्के, सुलेखा कारेपूरकर, लक्ष्मी बटनपूरकर, कमलताई मिटकरी, दिप्ती खंडागळे, यशपाल कांबळे, सिकंदर पटेल, एकनाथ पाटील, तबरेज तांबोळी, दगडूआप्पा मिटकरी, कैलास पाटील, डॉ. भाताब्रे, रमेश सूर्यवंशी, व्यंकटेश पुरी, रवीशंकर जाधव, अहमदखा पठाण, रणधीर सुरवसे, विष्णुदास धायगुडे, रत्नदीप अजनीकर, बालाजी सांळुके, शेख युनुस, रघुनाथ मदणे, पंडित कावळे, रईस टाके, राज क्षीरसागर, विजयकुमार साबदे, विकास कांबळे, गौस गोलंदाज, एम.पी.देशमुख, बिभीषन सांगवीकर, चंद्रकांत धायगुडे, शरद देशमुख, अयुब मणियार, सायरा पठाण, शितल मोरे, उषा चिकटे, शिला वाघमारे, गणेश देशमुख, जालीदर बर्डे, सय्यद अशदुल्ला, सुनिता रसाळ, ॲड. देविदास बोरूळे पाटील, अविनाश बट्टेवार, गौरव काथवटे, सचिन बंडापले, नागसेन कामेगावकर, जब्बार पठाण, सचीन गंगावने, अमित जाधव, राम गोरड, नेताजी बादाडे, अविनाश बटटेवार, मोहन सुरवसे, धनजय शेळके, अभिजीत इगे, अकबर माडजे, बालाजी झिपरे, हंसराज जाधव, गोविंद ठाकूर, ॲड. अंगद गायकवाड, हमीदपाशा बागवान, अशुतोष मुळे, दत्ता सोमवंशी, नागसेन कामेगावकर, विकास कांबळे, यशपाल कांबळे, सय्यद असदुल्ला, अमन सय्यद, बप्पा मार्डीकर, पवन सोलंकर, नरेश पवार, पवनकूमार गायकवाड, फैजल काममखानी, प्रमोद जोशी, विजय टाकेकर, गिरीश ब्याळे, अक्षय मुरळे, राज क्षिरसाग जय ढगे, मौनोददीन शेख, ज्ञानोबा गवळे, सत्यावान कांबळे, खाजामिया शेख, दिनेश गोजमगुंडे, अजय वागदरे, सलीम शेख, धनराज गायकवाड, शिवाजी सुर्यवंशी, रणधीर सुरवसे, दयानंद कांबळे, हरीभाऊ गायकववाड, पिराजी साठे, राज कांबळे, विकास वाघमारे, जी.ए.गायकवाड, कुमारअप्पा पारशेटटी, मारूती पांडे, महादेव बरूरे, मारूती चव्हाण, जीवन सुरवसे, सुमित खंडागळे, फरजाना बागवान आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

——— 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]