माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहरातील लक्ष्मी ग्रँड फंक्शन हॉलचे उद्घाटन
लातूर( प्रतिनिधी):– :राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील खाडगाव रिंग रोड परिसरातील प्रसिद्ध व्यावसायिकदीपक कोटलवार यांच्या लक्ष्मी ग्रँड फंक्शन हॉलचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेकर भानुदास वट्टमवार हरिभाऊ कोटलवार दिपक कोटलवार आकाश कोटलवार क्रडाई असोसिएशन लातूरचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी संजय निलेगावकर सुरेश पेन्सलवार रमेश बियाणी दिलीप माने अशोक गोविंदपुरकर व्यंकटेश पुरी संगम कोटलवार राम स्वामी अविनाश बट्टेवार कोटलवार कुटुंबीय मित्रपरिवार नागरिक काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की दीपक कोटलवार यांच्या पुढाकाराने लातूर शहरात भव्यदिव्य फंक्शन हॉल उभा राहिला आहे.कोटलवार कुटुंबीय व देशमुख कुटुंबीय यांचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत हरिभाऊ कोटलवार हे लोकनेते विलासराव देशमुख यांचे जिवलग मित्र होते लोकनेते विलासराव देशमुख म्हणायचे जे जे नव ते ते लातूरला हवं कोटलवार कुटुंबीयांनी व्यवसाय व्यापार उद्योग समाजकारण याकडे अधिक लक्ष दिले आहे असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की लातूरमध्ये अनेक मंगल कार्यालय झालेली आहेत हे नव लातूर आहे पुणे मुंबई सारखा विकास येथे होत आहे येथे व्यवसाय व्यापारासाठी सुरक्षित वातावरण आहे लातूर आणखी खूप पुढे जाणार आहे .लातूरला वंदे भारत रेल्वे आली पाहिजे लातूरचे विमानतळ काही महिन्यात सुरू होईल लातूरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम आम्ही करतो लातूरची संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे असे सांगून त्यांनीकोटलवार कुटुंबियांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेकर भानुदास वट्टमवार क्रडाई असोसिएशन लातूरचे अध्यक्ष जगदीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक कोटलवार यांनी करून लक्ष्मी ग्रँड फंक्शनहॉलची सविस्तर माहिती दिली .तर सूत्रसंचालन संजय जेवरीकर यांनी केले. शेवटी आभार आकाश कोटलवार यांनी मानले.