संत, महात्मे यांच्या संस्कारामुळे आणि शिकवणी मुळेच आपल्यात माणुसकी
संत रोहिदास महाराज जयंती कार्यक्रमात आ. रमेशआप्पा कराड
लातूर दि.०७ – संत, महात्मे यांनी कुठल्याही एका जाती, धर्मासाठी नाही तर सर्वांसाठी जगाच्या कल्याणासाठी काम केले आहे. सुखात दुखात आधार देतात. संत, महात्मे नसते तर माणसात माणूस राहिला नसता. त्यांच्या संस्कारामुळे आणि शिकवणीमुळे आपल्यात माणुसकी आहे असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.
लातूर तालुक्यातील मौजे अंकुली येथे राष्ट्रसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आ. रमेशआप्पा कराड यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी पार पडला. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रोहिदास वाघमारे, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष रवी कुरील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, सरपंच समाधान आडगळे, उपसरपंच सुधाकर गवळी, श्याम वाघमारे, बालाजी साबळे, हनुमंत तुधारे, खंडू बनसोडे, राजेंद्र साबळे, श्रीकांत पाखरे, सुरज साबळे, धनराज शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जोपर्यंत एकमेकाशी माणूस म्हणून वागणार नाहीत तोपर्यंत कोणीही कितीही मोठा असला तरी तो छोटाच असतो हे विसरून चालणार नाही, असे सांगून आ. रमेशआप्पा कराड यावेळी बोलताना म्हणाले की, राजकारण निवडणुकीपुरते करावे. छोट्या छोट्या समाजाला संरक्षणाबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या सात आठ वर्षात जात, धर्म, पंथ न पाहता गोरगरीब गरजूंनासाठी विविध योजना सुरू करून त्या योजनांचा थेट लाभ मिळून देण्याचे काम केले आहे अशी माहिती दिली.
आमदार नसतानाही अंकुली गावाच्या विकासासाठी शासनाचा निधी मिळवून दिला आता तर मी आमदार असल्याने आणि राज्यात आपले सरकार आल्याने जे जे शक्य आहे त्या योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू अशी आ, रमेशआप्पा कराड यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला, यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून रोहिदास महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी श्रीमंत आगवाने, सुभाष धोत्रे, सोपान आगवाने, रघुनाथ महाराज, दगडू आगवाने, सुभाष जाधव, नागनाथ आगवाने, शंकर चव्हाण, प्रशांत शिंदे, दत्ता सपकाळ, बालाजी गवळी, अक्षय कैले, बालाजी मुळे, लिबराज शिंदे यांच्यासह अंकोली येथील ग्रामस्थ समाज बांधव महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.