रेणापूर येथील कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे
युवा नेते ऋषिकेश कराड यांच्या हस्ते भूमिपूजन
लातूर दि.०६– नमो चषक 2024 अंतर्गत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण आणि नमो केसरी कुस्ती स्पर्धा ११ फेब्रुवारी २०२४ रोजी रेणापूर येथे आयोजित करण्यात आले असून या नमो केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे भूमिपूजन आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ भाजपाचे युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी झाले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने लातूर आणि रेणापूर या दोन तालुक्यात क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, खो खो, कॅरम, कुस्ती यासह विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. दोन्ही तालुक्यातील स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडू सह क्रीडाप्रेमीची गर्दी होत असून या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आणि नमो केसरी कुस्ती स्पर्धा रेणापूर येथे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येत असून भाजपाचे युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते मंगळवारी दुपारी रेणापूर येथील मैदानावर मंडप उभारणीचा शुभारंभ आणि कुस्तीच्या आखाड्याची भूमिपूजन करण्यात आले.

जिल्ह्यातच नव्हे तर सबंध मराठवाड्यात लातूर ग्रामीणचा नमो चषक बक्षीस वितरण सोहळा भव्य दिव्य व्हावा या कार्यक्रमास विविध खेळाडूसह क्रीडाप्रेमी, नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले पाहिजे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी असे यावेळी ऋषिकेश कराड यांनी बोलून दाखविले तर तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. नवनाथ भोसले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.

यावेळी भाजपाचे वसंत करमोडे, सतीश आंबेकर, अमर चव्हाण, सुकेश भंडारे, चंद्रकांत कातळे, दत्ता सरवदे, गणेश तूरूप, सुंदर घुले, अच्युत कातळे, विजय चव्हाण, दत्ता आंबेकर, शिला आचार्य, उत्तम चव्हाण, संतोष राठोड, राजकुमार मानमोडे, दत्ता उगिले, अंतराम चव्हाण, चंद्रकांत माने, गणेश माळेगावकर, हरिदास कराड, बाबुराव कस्तुरे, दिलीप चव्हाण, ओम चव्हाण यांच्यासह कुस्ती खेळाडू विष्णू भोसले, भरत कराड, बाळू कोपणार त्याचबरोबर भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.