*राहुल देशपांडे भक्तीसंध्या*

0
269

औसेकराच्या नववर्षाची सुरवात राहूल देशपांडे यांच्या भक्तीसंध्या कार्यक्रमाने…. 

आ. अभिमन्यू पवार यांची संकल्पना...

औसा, -( प्रतिनिधी)- नववर्षाची सुरवात भक्तीसंगीताच्या हर्षोल्हासात व्हावी यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने दि.१ जानेवारी रोजी औसा येथे जगप्रसिद्ध शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांच्या भक्तीसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता उटगे मैदान उंबडगा रोड औसा याठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उदघाटक म्हणून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर तर प्रमुख अतिथी म्हणून औसा नाथ संस्थानचे पिठाधिपती हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांची उपस्थितीत राहणार आहे. गतवर्षी आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या वतीने हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या आध्यात्मिक कीर्तन सोहळ्याने नववर्षाची सुरवात करण्यात आली होती.  नवीन वर्षाच्या स्वागतार्ह नागरिकांना भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाची मेजवानी देण्याचा हा प्रयत्न केला जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाच्या ठिकाणी फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्क वापरणे अनिवार्य असणार आहे.अधिकाधिक लोकांना कार्यक्रमात आॅनलाईन सहभागी होता यावे यासाठी कार्यक्रमाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या फेसबुक पेजवरून फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here