लातूर; दि. ८ – भारत सरकारच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक 12 ते 16 जानेवारी या कालावधीत कर्नाटक राज्यातील हुबळी येथे राष्ट्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .या युवक महोत्सवासाठी दयानंद कला महाविद्यालयातील बीए प्रथम वर्गात शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.यात अधिराज जगदाळे, श्रीनिवास बरीदे, अनंत खलुले व अनमोल कांबळे यांचा समावेश आहे.या विद्यार्थ्यांची निवड नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड व नेहरू युवा केंद्राचे संजय ममदापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.प्रशांत मान्नीकर,उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ दिलीप नागरगोजे , डॉ संदीपान जगदाळे, डॉ अशोक वाघमारे,बालाजी सुळ, ज्योतिबा बडे,कार्यालयीन अधीक्षक रूपचंद कुरे यांची उपस्थिती होती.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्राच्या साक्षी समय्या,दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे,ललितभाई शाह,रमेशकुमार राठी, सरचिटणीस श्री. रमेशजी बियाणी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन आदींनी अभिनंदन केले आहे.