27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeसामाजिक*राष्ट्रसंतांच्या अस्थी पळवल्या...बद्दल अफवा पसरून राष्ट्रसंतांचे बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची...

*राष्ट्रसंतांच्या अस्थी पळवल्या…बद्दल अफवा पसरून राष्ट्रसंतांचे बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी*

काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे सर्व भक्त व्यतीत झाले असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहे असे प्रकार खपवून जाणार नसल्याचेही भगवंतराव पाटील यांनी पुढे सांगितले भक्ती स्थळाच्या संबंधीचे काय जे वाद असतील ते असो पण राष्ट्रसंतांची व त्यांच्या पवित्र समाधीची बदनामी करणाऱ्या या प्रकारामुळे निश्चितच समाजामध्ये निवेदन देणाऱ्या विषयी आक्रोश पसरला आहे एखादे स्वार्थी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकतात याचे ते उदाहरण आहे सदर निवेदनावर सह्या करणारे लोक यांना राष्ट्रसंतांनी भक्ती मधून काढून टाकले असून नवीन ट्रस्टी ही मागील दोन वर्षापासून काम करत आहे त्यांचे काम उत्कृष्ट असून ते देखत नसल्यामुळेच हा प्रकार झाल्याचा दिसून येत आहे तसेच याबाबत आम्ही दिनांक दोन नोव्हेंबर रोजी माननीय पोलीस अधीक्षक यांना यांच्याकडे मागणी केली असून समाधीला संरक्षण मिळावे असे निवेदनात म्हटले आहे सदर गोष्ट त्यांना मागील आठ दिवसापासून माहित असूनही केवळ बदनामी करण्यासाठी त्यांनी सदर बातमी व चुकीचे वृत्त दिल्याचे दिसून येत आहेत याबाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती अध्यक्ष या नात्याने मी करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

विश्वस्त काढल्यावरून सदर निवेदन देणाऱ्यांना राष्ट्रसंतांच्या उत्तरे अधिकाऱ्यांनी बघतीसह विश्वस्त पदावरून काढल्या असून त्याचा राग मनात धरून वेळोवेळी निवेदने तक्रारी देत आहे तसेच राष्ट्रसंतांचे समाधीचे बांधकाम होऊ नये अशीही त्यांची इच्छा आहे त्यामुळे असे प्रकार होतात कपिलधार च्या सभेत शिवा संघटनेचे मनोहर जी धोंडे यांनी जाहीर सभेमध्ये दिनांक 7 नोव्हेंबर रोजी समाधी बांधकाम चालू आहे व सर्व भक्तांनी येऊन पाहावे असे आव्हान केले असतानाही पाच दिवस सदर निवेदन देणारे का थांबले याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतो, तू विश्वस्त की मी असा कोर्टामध्ये व धर्मादायक यांच्याकडे वाद चालू आहे त्यात निवेदन देणाऱ्यांनी राष्ट्रसंतांचे उत्तराधिकारीच आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले आहे मात्र भक्तही मानायला तयार नाही त्यामुळे आता शेवटचा प्रयत्न म्हणून असे प्रकार सदर व्यक्ती करत आहे समाधी बांधकाम होणारच आप्पांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे दगडी समाधी तसेच भूमिगत समाधी होणार असून वर समाधी मंदिर होणार आहे व हे काम कोणीही थांबू शकणार नाही हे आम्ही करूनच दाखवणार असेही व त्यासाठी सर्व विश्वस्त भक्त मंडळ शिवा संघटना हे सर्व सोबत आहेत व त्यांच्या सर्वांच्या सोबत घेऊन सदर काम होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले सदर निवेदन देणारे मागील दोन वर्षापासून भक्ती स्थळावर फिरकले नाही काय काम चालू आहे हे सुद्धा माहिती नाही फक्त स्टंटबाजी करणे अफवा पसरवणे समाजात दुखणे निर्माण करणे बदनामी करणे हीच कार्यक्रम घरी बसून करत आहे त्यांना खरीच आपण विशेष श्रद्धा भक्ती असतील तर स्वतः येऊन आणि काहीतरी केले असते स्वतःही करणार नाहीत आणि लोकांनाही करू देणार नाही भक्तकिती दिवस गप्प बसतील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]