● श्री गुरूजी आयटीआयचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सोव उपक्रम●
लातूर :
वासनगांव येथील रामगीर सेवावस्ती मध्ये श्री गुरूजी आयटीआयच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सोव उपक्रमा अंतर्गत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रिय कार्यकारिणी सदस्य अभियंता श्री.प्रविण सरदेशमुख यांच्या शुभहस्ते शंभर राष्ट्रध्वजाचे वितरण भारत माता की जय,वंदेमातरमच्या जयघोषात करण्यात आले.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सोव ‘ हर घर तिरंगा ‘ घरो घरी तिरंगा फडकाऊन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे सर्व भारतीय आपल्या घरावर तिरंगा लावून स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सोव साजरा करत आहे. सेवावस्तीतील बांधवांनीही तो तसाच साजरा करावा यासाठी श्री गुरूजी आयटीआयच्या वतीने रामगीर सेवावस्तीत शंभर राष्ट्रध्वजाचे मोफत वितरण करण्यात आले व सेवावस्तील शंभर घरावर तिरंगा ध्वज फडकवण्यात आले.
रामगीर सेवावस्तीतील वातावरण तिरंगामय झाले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सेवावस्तीतील महिलाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वस्तीतील शालेय विद्यार्थी, तरूण तरूणीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पूर्ण सेवावस्तीत भारत माता की जय, वंदेमातरमचा जयघोष पहायला मिळाला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
यावेळी संस्था अध्यक्ष अतुल ठोंबरे, बाळासाहेब चाकुरकर सर, पी.व्ही देशमुख सर, शंकर वलसे सर , समर्थ पिंपळे सर, अजय होलगे सर, विकास घोडके, सौ.दिपाली महालंग्रेकर, अक्षय जोशी सर सेवा वस्तीतील जेष्ठ,तरूण,महिला,विद्यार्थी उपस्थित होते.