16.7 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeक्रीडाराफेल नदाल टेनिस सम्राट

राफेल नदाल टेनिस सम्राट

राफा तुला सलाम….
राफेल नदाल अखेर टेनिस विश्वाचा सम्राट बनला आहे. डॅनिएल मेदवेदेवला पाच सेट्समध्ये हरवत राफानं आज २१वं ग्रॅंड स्लॅमपद जिंकून रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविचला (दोघेही प्रत्येकी २० ग्रॅंडस्लॅम विजेते) मागं टाकलं आहे. राफानं आतापर्यंत १३ फ्रेंच ओपन, ४ अमेरिकन ओपन, २ विंबल्डन आणि दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. त्यापैकी पहिली फ्रेंच ओपन त्यानं २००५ मध्ये जिंकली होती. म्हणजेच तब्बल १७ वर्षं त्यानं टेनिस कोर्टवर राज्य केलं आहे. राफाचं कौतुक अशासाठी की गेले काही महिने त्याला अनेक दुखापतींनी ग्रासलं होतं. अगदी दोन महिन्यांपूर्वी त्याला साधं एक पाऊलही टाकता येत नव्हतं. त्याच पस्तिशीतल्या राफानं आज आपल्यापेक्षा दहा वर्षांनी तरुण असलेल्या मेदवेदेवला साडे पाच तासांच्या लढतीत हरवलं. विशेष म्हणजे पहिले दोन सेट्स तो पिछाडीवर होता. जवळपास संपल्यातच जमा होता. मात्र अगदी पराभवाच्या उंबरठ्यावर त्यानं आधी आपलं मनोबल उंचावलं. आपोआप खेळही उंचावला आणि त्यानं एक अशक्यप्राय विजय मिळवला. आपल्या चांगल्या कामगिरीतून त्यानं मेदवेदेवला आधी चुका करायला भाग पाडलं, स्वतःचा तोल कधीही ढळू दिला नाही आणि त्याचं संपूर्णतः मानसिक खच्चीकरण केलं. राफाच्या या विजयातून एकच गोष्ट स्पष्ट होते, मनात आणलं तर अशक्य काहीच नाही… राफा तुझं अभिनंदन!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]