32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeराजकीय*राज ठाकरेंच्या मुलाला शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार?*

*राज ठाकरेंच्या मुलाला शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार?*


भाजपा आणखीन एका धक्कातंत्राच्या तयारीत

मुंबई,; दि.१४ (विशेष प्रतिनिधी) — राज्यातील सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिली आहे. अमित ठाकरे सध्या आमदार किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. असे असतानाही त्यांना मंत्री करण्याचा निर्णय हा शिवसेनेतील ठाकरे कुटुंबाचा प्रभाव कमी करण्याचा आणखी एक प्रयत्न असू शकतो. भाजपाने नुकतेच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक करुन स्वतःकडे उपमुख्यमंत्री ठेवले आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वृत्तानुसार, शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपाची ही नवी खेळी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवसेनेची सूत्रे हाती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत अमित ठाकरेंना मंत्रिमंडळात आणण्याच्या हालचाली या आदित्य ठाकरे यांच्यासाठी थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी अमित आणि आदित्य ठाकरेंना युवा नेतृत्व म्हणून समोर आणले आहे.

दरम्यान, मनसे नेत्यांचा दावा आहे की, त्यांना अशा कोणत्याही प्रस्तावाची माहिती नव्हती. भाजपा नेत्यांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राज ठाकरेंनी ही ऑफर धुडकावून लावल्याचे मनसेतर्फे सांगण्यात येत आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

दशकभरापूर्वी, मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी पहिल्यांदाच मनसेच्या रोड शोमध्ये भाग घेतला होता, जो राजकारणातील त्यांचा प्रवेश मानला जात होता. मात्र, अभ्यासाचे कारण देत ते राजकारणापासून दूर गेले. यानंतर जुलै २०१४ मध्ये ते पुन्हा एकदा मनसे विद्यार्थी सेनेच्या पहिल्या मेळाव्यात दिसले. त्यानंतर मात्र ते राजकारणापासून अंतर ठेवून आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]