सोहळ्यास जेष्ठ पत्रकार मधुकर भावे ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर वैशालीताई विलासराव देशमुख यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार
लातूर दि. ८.
गुरधाळ तालुका देवणी जिल्हा लातूर येथील मानव विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक, शैक्षणिक, सहकार , राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व भरीव योगदान दिल्याबद्दल यावर्षीचा “मानवसेवा जीवनगौरव’ पुरस्कार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांना जाहीर करण्यात आला असून या बरोबरच राज्यातील शैक्षणीक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या विभुतीना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार असून हा पुरस्कार सोहळा ९ जुलै रोजी रवीवारी सकाळी १० वाजता दयानंद सभागृह लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा मानवसेवा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहणार आहेत तर विठ्ठल रूकमाई देवस्थानचे सह कार्याध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून विलास साखर कारखान्याचे अध्यक्षा वैशालीताई विलासराव देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख,आमदार बाबासाहेब पाटील, राज्याचे मंत्री आमदार संजय बनसोडे आमदार धीरज विलासराव देशमुख, आमदार विक्रम काळे उपस्थित राहणार आहेत.
या सोहळयात “मानवसेवा जीवनगौरव” पुरस्कार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना व राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात येणर आहे या सोहळ्यास लातूरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन मानव विकास बहूउद्येशिय सेवाभावी संस्था गुरधाळ यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक वसंत घोगरे पाटील, अध्यक्षा सौ. सरोजा वसंत घोगरे पाटील, विद्याधर बिरादार, पांडूरंग पटवारी, विजयकुमार कुमठेकर, ब्रिजलाल कदम,ह.भ.प. बाळकृष्ण काळे महाराज,अनंत घोगरे, शिवाजी जाधव, मोहन कदम व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.