उदगीर : ( दिनांक २६ जून २०२२ ) इंडियन स्टुडंट कौन्सिलच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. यावर्षी राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्कार’ महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके यांना जाहीर करण्यात आला आहे.
त्याबद्दल म. ए. संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जून मानकरी, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश तोंडारे, सहसचिव डॉ. आर. एन. लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, सदस्य शिवाजी हुडे, प्रशांत पेन्सलवार, सुभाष धनुरे, प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के, उपप्राचार्य प्रा. सी. एम. भद्रे यांच्यावतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.