लातूर ;दि. ११ – विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर (रुई) येथे आयोजित ‘राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती – राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे बुधवारी सकाळी स्वच्छता व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व शांती केंद्राचे अध्यक्ष प्रा डॉ विश्वनाथजी कराड साहेब हे होते तर याप्रसंगी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, औसा येथील आमदार अभिमन्यु पवार, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास,महाराष्ट्र केसरी श्री विष्णू जोशीलकर, श्री संभाजी आजगावकर श्री शिवाजीराव केकान श्री राहुल काळभोर माजी सरपंच श्री. तुळशीरामआण्णा कराड, प्रा. मंगेशबापू कराड, संयोजन समितीचे विलास कचूरे, श्री. राजेश कराड मोहन माने नवनाथ अल्टे यांच्यासह अनेक मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. स्पर्धेचे हे चौदावे वर्ष आहे.

उद्घाटनाची कुस्ती प्रशांत जाधव श्रीवर्धन लोंढे आणि धैर्यशील शिंदे प्रशांत शिंदे यांचे यांच्यात झाली. प्रारंभी श्री प्रभु रामचंद्र मंदिरापासून संत गोपाळ बुवा मंदिरापर्यंत प्रमुख पाहुण्यासह कुस्ती स्पर्धेतील खेळाडूंची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

ऋषितुल्य विश्वनाथजी कराड यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यातून वेगळा ठसा निर्माण केला असून त्यांचे नाव आज देशभरच नव्हे तर जगभर झाले आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारे गाव म्हणून रामेश्वर देशभर नावारूपाला आले आहे असे सांगून राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की मातीतील कुस्तीचे दिवस संपत असतानाच कराड साहेबांनी कुस्ती स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे मोठे काम केले असे बोलून दाखविले. व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रा. विश्वनाथजी कराड यांनी महाराष्ट्रही संतांची भूमी असून वेगवेगळ्या जाती धर्मात जन्मलेल्या संत महंतांनी सर्व समाजासाठी जगाच्या कल्याणासाठी काम केले त्यांनी दाखवून दिलेले मार्गच जगाचे कल्याण करू शकतात असे बोलून दाखविले याप्रसंगी खा. सुधाकर शृंगारे आ अभिमन्यु पवार प्रा. राहुल कराड यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कुस्ती स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमास कुस्ती खेळाडूसह रामेश्वर आणि पंचक्रोशीतील नागरिक क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.