उदगीर–या मतदार संघाचे आमदार व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नामुळे हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या विकासासाठी ३कोटी२८लाख,५१हजारांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे.
हत्तीबेटाच्या विकासासाठी सन२०१२सालापासून पर्यटनाचा कोणताच निधी मिळाला नसल्यामुळे हत्तीबेटाचा विकास ठप्प झाला होता. दोन वर्षांपूर्वी हत्तीबेट पर्यटन स्थळास”ब”वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी हत्तीबेट विकासाचा बृहत आराखडा तयार करण्याच्या सूचना या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून केली होती. त्याप्रमाणे हत्तीबेटावर श्री,सद्गुरू गंगाराम बुवा मंदिरासमोर दोन मजली सभागृह बांधकाम करण्यासाठी २कोटी,४८लाख६३हजार रुपयांचा निधी,स्वच्छता गृह बांधकाम करण्यासाठी१७लाख,५७हजार,पर्यटकांना बसण्यासाठी कोप्या उभारणे १३लाख,९९हजार, भक्त निवास बांधणे ४८लाख,३२हजार रुपये असा एकूण ३कोटी,२८लाख,५१हजार रुपयांचा निधी राज्याच्या पर्यटन विभागाने मंजूर करून या बाबतचे आदेश मंत्रालयातून मंगळवारी निघाले आहेत.
*राज्यमंत्री बनसोडे मुळेच निधी मंजूर–
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नामुळेच हत्तीबेट विकासासाठी तब्बल ९वर्षानंतर हा ३कोटी२८लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शिवाय राज्यमंत्री बनसोडे व जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. बी. यांच्या प्रयत्नामुळे ८०लाख रुपयांची हत्तीबेट पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून,येत्या दोन दिवसात देवर्जन प्रकल्पातील पाणी हत्तीबेटाला सुरू होणार आहे.
व्ही.एस. कुलकर्णी, पत्रकार,
हत्तीबेट भक्त.