समीर बंसल यांच्या उपस्थितीत शनिवारी शुभारंभ
लातूर/प्रतिनिधी ः- शिक्षणाचा लातूर पॅटर्न संपुर्ण देशात परिचत आहे. या पॅटर्नला अधिक झळाळी मिळावी आणि लातूर येथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना राजस्थानच्या कोटा येथील बंसल क्लासेसचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने लातूर येथे बंसल क्लासेचा शुभारंभ उद्या दि. 11 जून रोजी क्लासेसचे कार्यकारी संचालक समीर बंसल व संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येत आहे. या शुभारंभ सोहळ्यास जिल्ह्यातील पालकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन चंदुलाल बियाणी, कमलाकर कुलकर्णी व अमर मानकरी यांनी केले आहे.
लातूर हे शिक्षणासाठी केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशात सर्वदूर पोहचला असून महाराष्ट्र राज्यासह देशाच्या विविध कानाकोपर्यातील विद्यार्थी लातूरात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या विद्यार्थ्यांना राजस्थान येथील प्रसिद्ध असलेल्या कोटा क्लासेसचे मार्गदर्शन मिळावे याकरीता सदर क्लासेस लातूर येथे सुरु करण्यात येत आहे. बंसल क्लासेस गत चाळीस वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेले आहेत. या क्लासेसच्या माध्यमातून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट बोर्डासह सिबीएसई पॅटर्नचेही मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. तसेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व मॅथ्स या विषयाचे मार्गदर्शन अकरावीसह बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. याचबरोबर आयआयटी जेईई, नीट, व एमएचटी सीईटी सह प्रि-फाउंडेशन कोर्सेसच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार आहे. यासाठी अनुभवी शिक्षकवृंद पाचारण करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरीता करीयर मार्गदर्शन व अभ्यासक्रमाविषयी असणारा समस्या सोडविण्याकरीता सेमिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. बंसल क्लासेसच्या माध्यमातून एक लाखापेक्षा अधिक डॉक्टर व आयआयटीयन विद्यार्थी घडविण्यात आले आहे.
या क्लासेसने आजतागायत ऑल इंडिया वन रॅक पाच वेळेस, ऑल इंडिया सेकंड रॅक सहा वेळेस तर ऑल इंडिया थर्ड रॅक सुद्धा सहा वेळेस प्राप्त केलेले आहे.
बंसल क्लासेच्या संपुर्ण देशभरात शाखा असून आता लातूरमध्येही राजस्थान येथील कोटाच्या बंसल क्लासेसचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. या क्लासेचा शुभारंभ उद्या दि. 11 जून रोजी सकाळी 11 वाजता क्लासेसचे कार्यकारी संचालक समीर बंसल व संत सुश्री अलकाश्रीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येत आहे. या निमित्ताने संत सुश्री अलकाश्रीजी यांचे संगीतमय सुदंरकांड, बालाजी मंदीर येथे दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांना जिल्ह्यातील पालकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत रहावे असे आवाहन चंदुलाल बियाणी, बद्रीनारायण बाहेती, डॉ. रामेश्वर बांगड, प्रा. कैलास घुगे, कमलाकर कुलकर्णी व अमर मानकरी यांनी केले आहे.