लातूर ; दि. २० ( वृत्तसेवा ) -भाऊ-बहिणीच्या रेशमी नात्याचा रक्षाबंधन सण अवघ्या दहा दिवसांवर आला आहे. बाजारात रंगीबेरंगी राख्यांची रेलचेल आहे. मात्र याला अपवाद ठरवत कापूर तुळस बियांपासून विघटनशील अर्थात पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. आज या टीमच्या कार्याला १५४० दिवस पूर्ण झाले आहेत आणि या १५४० दिवसात यापूर्वी प्रत्येक सण झाडांसोबत साजरा केला जात होता आता त्यापुढे जाऊन सणा सोबत प्रत्येक घरात झाड उगवले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या ग्रीन लातूर वृक्ष टीमने ही आगळी वेगळी राखी बनवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
बऱ्याचदा राख्या बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या पदार्थांचे निसर्गात लवकर विघटन होत नाही. शिवाय त्यात वापरले जाणारे रंग हे रासायनिक असतात. त्यामुळे त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो.

कशी बनते कपूर व तुळस बीयांची राखी?
इकोफ्रेंडली राखी बनवण्यासाठी कागद, खपट, लोकर धागा, कापूर तुळस बिया, नैसर्गिक रंग यांचा वापर करण्यात आला आहे.
ही तुळस बी राखी कुंडीत टाकल्यावर त्यात वापरण्यात आलेल्या बी मुळे त्यातून रोपटं उगवतं. त्यामुळे निसर्गरक्षणाशी जोडणारा हा राखीचा धागा सर्वांच्या पसंतीस उतरतोय.
या राखी पौर्णिमेला बियांच्या राख्यांनी भाऊ- बहीण यांनी हे नाते साजरे करावे असा प्रयत्न लातूर येथील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सदस्यांनी केला आहे.
या राख्या तयार करण्यासाठी शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सत्तर विद्यार्थीनि सहभाग नोंदवला.
या पर्यावरणपूरक राख्यां पंतप्रधान नरेद्रज़ी मोदी, भारतीय सैन्य दलातील सैनिक यांना कुरिअरने पाठविल्या आहेत.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, ऍड वैशाली यादव, माजी नगरसेविका श्वेता लोंढे, दयाराम सुडे, बळीराम दगडे, पांडुरंग बोडके, शुभम आवाड, ओंकार सदरे, अमृता दाताळ, पूजा पाटील, श्रीमती रंजीता कोताळकर, जे. सी. राठोड, संस्थेचे प्राचार्य डॉ. के एम बकवाड सर, श्रीमती प्रोनोती ईतवाडे, अनघा गाढवे, शुभांगी मुंडे अपेक्षा अलगुडे अंकिता घोलप, शिवप्रभा घोडके, स्नेहल कोहाळे, सरिता भुजबळ, एन एस एस टीम यांनी परिश्रम घेतले .