27.6 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्या*रस्त्यातील धोकादायक विद्युत खांब न हटवल्यास तिरडी मोर्चा*

*रस्त्यातील धोकादायक विद्युत खांब न हटवल्यास तिरडी मोर्चा*

युवा महाराष्ट्र सेनेचे महावितरण कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

इचलकरंजी ; दि.१३ ( प्रतिनिधी ) —इचलकरंजी येथील तीनबत्ती चौक ते चंदूर मार्गावर वर्दळ वाढल्याने या मार्गाचे रुंदीकरण झाले. मात्र रुंदीकरणानंतर रस्त्यात उभे असलेले विद्युत खांब न हटवल्याने अपघात नित्याचेच झाले आहेत. याबाबत नगरपालिका आणि महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने युवा महाराष्ट्र सेनेनं महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेऊन 8 दिवसात रस्त्यातील धोकादायक विद्युत खांब न हटवल्यास तिरडी मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

इचलकरंजीतील तीनबत्ती चौक ते चंदूर ओढ्यापर्यंतच्या मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने नगरपालिकेने रस्ता रुंद केला. मात्र रुंदीकरण करताना रस्त्याकडेला असलेले विद्युत खांब आता रस्त्यात आले आहेत. रत्यातील हे खांब नगरपालिका आणि महावितरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अद्याप न हटवल्याने या मार्गावर अपघात नित्याचे बनले आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने युवा महाराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांची भेट घेतली. यावेळी 8 दिवसांत रस्त्यातील धोकादायक खांब हटवून ते रस्त्याकडेला न घेतल्यास तिरडी मोर्चा काढु असा इशारा दिला.

यावेळी राठी यांनी महापालिकेकडे अंदाजीत खर्चाचा प्रस्ताव पाठवला असून त्याला मंजुरी मिळाल्यावर तत्काळ काम सुरू करु, असे आश्‍वासन दिले. यावेळी कृष्णा जावीर, सचिन पाटील, अवधुत भोई, रोहित कल्याणकर, बसवराज टक्कळगी, आनंद नाईक, सतीश कवडे, सचिन जाधव, अभिजीत रजपूत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]