रस्तेवाला आमदार..अभिमन्यू

2
623

औसा तालुक्याचे आमदार आणि माझे मित्र अभिमन्यू पवार गेल्या दीड वर्षापासून पायाला भिंगरी लावल्यासारखे सातत्याने मतदारसंघात फिरत आहेत..कोरोनाच्या काळातही त्यांनी आपला संपर्क कधीच कमी केलेला नाही..महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पाणंद रस्त्याचा आगळा वेगळा पॅटर्न देण्याचे काम त्यांनी केले आहे..स्वतःचा आमदार फंड शेत स्त्यासाठी खुला करून घेणारा,जो की असा वापरता येत नाही,मात्र त्यांनी अत्यंत कसबीने हा फंड शासनाकडून मागून घेतला..आणि प्रथमच सरकारने अश्या कामाला हा फंड वापरता येतो असे सांगितले..औसा मतदारसंघात जवळपास 600 किलोमीटर रस्ते करण्यात ते यशस्वी झाले..या पुढच्या टप्प्यात याच रस्त्याचे खडीकरण आणि त्या नंतर जे रस्ते 33 फुटाचे झाले आहेत त्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा त्यांचा हा पॅटर्न शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी क्रांती घडवणारा ठरणार आहे..स्वतःचा आमदार निधी आमदार असेपर्यंत शेत स्त्यासाठी देणारा हा महाराष्ट्रातला पहिला आमदार असावा..ही रस्त्याची क्रांती नक्कीच अभिमन्यूच्या नावावर लागली जाईल यात शंका नाही..ही किमया सुरू कशी झाली?निवडणूक मतदानादिवशी एका शेतकऱ्याची सोयाबीन बनीम केवळ रस्ता नसल्याने आणि वेळेत घरी न आणण्याने जळून गेली,आमदार होण्याआधी हा निरोप मिळाला,मतदान झाल्या दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याची भेट अभिमन्यूने घेतली..त्याचे सांत्वन केले,करायची ती मदत केली आणि हा अजून आमदार न झालेला माणूस रस्त्याच्या प्रश्नावर प्रचंड अस्वस्थ झाला..मनात ठरवले की जनतेने मतपेटीतून कौल दिला तर हीच मोहीम आपल्या जगण्याचा भाग करायची नाही कौल मिळाला तर शासन दरबारी या सगळ्या शेतकऱ्यांची पैरवी करायची आणि हे रस्ते खुले करून घ्यायचे..जनतेने कौल दिला,प्रचंड मताने विजय दिला..त्यानंतर या मोहिमेला हक्क प्राप्त झाला..आमदार म्हणून हक्काने आता अधिकाऱ्यांना बोलता आले..ही मोहीम आता अभिमन्यूच्या जगण्याचा एक भाग झाली आहे..दिवसरात्र एकच ध्यास त्यांनी घेतला आहे..गावागावात आता त्यासाठी भेटी सुरू आहेत..शेतकरी भेटेल तिथे साहेब डोक्यावरचे केस गेले हो,मला रस्ता मोकळा करून द्या यासाठी मागणी करत आहेत..गावागावात फटाके,बँड लावून आमदाराचे स्वागत होत आहे..हा बदल केवळ रस्त्याचा आहे..देशात रस्त्यासाठी गडकरी रोडकरी झाले इकडे खेड्यापाड्यात रस्तेवाला आमदार म्हणून अभिमन्यू लोकप्रिय होत आहेत..
हे नुसते रस्ते नाहीत तर शेतकऱ्यांच्या विकासाच्या धमण्या आहेत,असे म्हणत ही आता लोकचळवळ होत आहे..हे नुसते रस्ते नाहीत तर लोकांची मने जोडणारे महामार्ग बनत आहेत…या रस्त्यांमुळे गावागावातील वाद विकोपाला गेलेले बंद होणार आहेत , भाऊबंदकी आता संपत येत आहे..

आता दुसरी मोहीम,नकाशावरील रस्ते तर होतीलच मात्र पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पायवाटा,गाडीवाटा शेतकऱ्यांच्या संमतीने खुल्या करून देण्यासाठी आमदार पुढील काळात गावोगाव बैठका घेणार आहेत शेतकऱ्यांना आव्हान करणार आहेत..

हा रस्तेवाला आमदार रोड मॉडेल ठरावा याच शुभेच्छा..

@ संजय जेवरीकर
पत्रकार सरपंच

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here