भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन
सर्व कार्यक्रम प्रभाविपणे राबवावेत
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांचे प्रतिपादन
लातूर दि. ०२– भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीत बदल झाला असून शरीर मजबूत ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे कवायती कराव्या लागतात त्या प्रमाणे पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी पक्षाकडून आलेले सर्व अभियान यशस्वीपणे राबवावे लागतील. जर नाही राबवले तर पक्षाचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. येणारा काळ निवडणूकीचा आहे तेव्हा पक्षाच्या सर्व स्तरातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे सर्व कार्यक्रम प्रभावीपणे राबवावे असे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी केले.
लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रदेश भाजपाचे सरचिटणीस संजय केनेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड हे होते तर याप्रसंगी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार अभिमन्यू पवार, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष विनायकराव पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे, बब्रूवान खंदाडे, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रदेश भाजपाच्या सरचिटणीसपदी नव्याने नियुक्ती झाल्याबद्दल लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रारंभी सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी बोलताना संजय केनेकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीत खूप मोठा बदल झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यामुळे पक्षाच्या माध्यमातून सामाजिक चळवळ सूरू झाली असून या चळवळीतून समाजाची मानसिकता बदलणे आणि लोकसहभाग वाढविणे यावर भर देवून कार्यकर्ता हा जनतेत गेला पाहिजे यातून समाजात पक्षाची ओळख तयार होते पक्षाबरोबरच कार्यकर्त्याचीही जनतेत प्रतिमा निर्माण होते. पक्षाच्या बदलत्या भूमिकेनुसार नेत्याच्या मागे न फिरता जनतेत जाऊन कार्यकर्त्यांनी आपली ओळख निर्माण करावी असे आवाहन केले.
कार्यकर्त्याला उर्जा मिळाली पाहिजे, कर्मट कार्यकर्ता उभा राहीला पाहीजे, मनस्थितीने अथवा परिस्थितीने जरी एखादा कार्यकर्ता पुढे आला नसला तरी त्यांचे पक्षात योगदान कमी नाही. सातत्याने पक्षाला जीवंत ठेवणाऱ्या कार्यकर्त्याला जीवंत ठेवता आले पाहीजे असे सांगून संजय केनेकर म्हणाले की, भाषणाने परिस्थिती बदलत नाही तर ती मानसिकतेतून बदलते. जनतेत नेता तर पक्षात कार्यकर्ता कार्यरत असतो. पक्षाच्या कार्यक्रमात कार्यकर्त्याचा सहभाग महत्वाचा असतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुरू केलेल्या जनहित योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोंहचावे. पक्षाने वेगवेळी दिलेले अभियान यशस्वी करावेत.
जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारा नेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोन्ही नेते स्वच्छ प्रतिमा असणारे बेदाग नेते आपल्याला लाभले आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे सांगून यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, प्रदेश भाजपा कडून दिलेले सर्व कार्यक्रम आजपर्यंत लातूर जिल्हा भाजपाने यशस्वी केले असून सेवा पंधरवाडा अभियानात जिल्हाभर सेवाकार्य मोठया प्रमाणात करण्यात आले. येत्या तीन-चार महिन्यात जिल्हयात तीन लाख वृक्षारोपन करण्यात येणार असल्याची माहिती देवून संजय केनेकर यांच्या रूपाने मराठवाडयातील हाडाचा कार्यकर्ता प्रदेश भाजपाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचा मनस्वी आनंद झाला असल्याचे बोलून दाखविले.
प्रारंभी मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांनी पक्षाच्या आगामी कार्यक्रमाची माहिती दिली. तर खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, सुधाकर भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त करून संजय केनेकर यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी केले. या बैठकीस जिल्हयातील भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध आघाडी व मोर्चाचे प्रमुखासह अनेकांची उपस्थिती होती.