इचलकरंजी: प्रतिनिधी
येथील युवा साहित्यिक व पञकार विनायक शशिकांत होगाडे यांच्या डियर तुकोबा या पुस्तकास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा ( कोल्हापूर) कृ.गो.सुर्यवंशी संकीर्ण ग्रंथ पुरस्कार व वाचनकट्टा या संस्थेचा उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार असे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
युवा साहित्यिक विनायक शशिकांत होगाडे यांच्या डियर तुकोबा या पुस्तकात संत तुकाराम यांचे एकूणच कार्य व प्रबोधनात्मक लेखनाचा आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकाला तुकाराम महाराजांचे वंशज आणि अभ्यासक सदानंद मोरे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांचाही अभिप्राय मिळाला आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर वर्षभरातच चार आवृत्त्या संपल्या असून आता वर्षपूर्तीला लवकरच पाचवी आवृत्ती बाजारात येत आहे. इतकी डियर तुकोबा या पुस्तकाने लोकप्रियता मिळवली असून ती संत तुकाराम यांचे जीवन कार्य , प्रबोधन समजून घ्यायला महत्वपूर्ण ठरली आहे.यापूर्वीचे त्यांचे ओह माय गोडसे हे पुस्तक देखील तितकेच लोकप्रिय ठरले असून त्याची लवकरच दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.डियर तुकोबा या पुस्तकास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा ( कोल्हापूर) कृ.गो.सुर्यवंशी संकीर्ण ग्रंथ पुरस्कार व वाचनकट्टा या संस्थेचा उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार असे दोन पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.या पुरस्काराचे लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण होणार असल्याचे संयोजकांनी पुरस्कार निवड पञामध्ये म्हटले आहे.
या पुरस्काराने इचलकरंजी शहराचा साहित्य क्षेत्रात पुन्हा एकदा नावलौकिक वाढला असून इचलकरंजी शहराच्या यशाच्या शिरपेचात तो आणखी एक मानाचा तुरा रोवणारा ठरला आहे.
या पुरस्काराबद्दल युवा साहित्यिक विनायक होगाडे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.