24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeराजकीय*युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केलेल्या बुथ मांडणीचे भाजपा वरिष्ठ नेत्याकडून...

*युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केलेल्या बुथ मांडणीचे भाजपा वरिष्ठ नेत्याकडून कौतुक*

निलंगा-(प्रशांत साळुंके)-

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील साहेब व माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील बूथ रचना सक्षम करून शंभर टक्के बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख रचनेचे कार्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्याकडे सोपवले.

नेतृत्वाने टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून ज्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली गेली होती त्या संपूर्ण विभागात जिल्हा निहाय तालुका निहाय दौरे करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बूथ रचनेचे पुनर्घटन करून 90 टक्के बूथ सक्षम करण्याचे कार्य व त्याचबरोबर बूथ व शक्ती केंद्रप्रमुख रचनेतील सर्व कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी कार्यरत राहण्यासाठी दिलेले योगदान अरविंद पाटील निलंगेकर याचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्ष अध्यक्ष वरिष्ठ नेत्यांनी विजय संकल्प 2024 या कमिटीमध्ये अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांची नेमणूक सदस्य म्हणून केले.


2024 मध्ये होऊ घातल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी बूथ /शक्ती केंद्र प्रमुख म्हणून कार्य करणारे कार्यकर्ते अतिशय प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी व विजयश्री खेचून आणण्यासाठी महाराष्ट्राच्या बूथ सक्षमी करणाचे संयोजक म्हणून अरविंद पाटील निलंगेकर साहेब यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली.

9वर्षात देशाची यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या जन उपयोगी निर्णयाची माहिती बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख पन्ना प्रमुखांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम बूथ प्रमुखाच्या माध्यमातून केले जाते आहे .बूथ रचना महाराष्ट्रभर सक्षम व प्रभावी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र अध्यक्षांनी बूथरचनेची महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवलेली आहे त्या अनुषंगाने अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी
भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४’ या अभियानाचा प्रशिक्षण वर्ग भिवंडी, मुंबई येथे पार पडला. या बैठकीमध्ये ‘महाविजय २०२४’ प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून बूथ सशक्तीकरण व बूथ रचनेचा विषय अतिशय प्रभावीपणे मांडला, केलेली मांडणी अतिशय प्रभावी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ केंद्रीय व राज्य नेत्यांनी अरविंद पाटील निलंगेकर कौतुक केले आहे.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे सी.टी. रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार आणि महाविजय २०२४ अभियानाचे संयोजक श्रीकांत भारतीय यांच्यासह महाराष्ट्रातील मंत्रीगण, पक्षाचे सर्व आमदार, खासदार, निवडणूक प्रमुख व भाजपा प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]