16.6 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीययुवकांनी उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घ्यावी.ना.संजय बनसोडे.

युवकांनी उद्योग व्यवसायात उत्तुंग भरारी घ्यावी.ना.संजय बनसोडे.

अहमदपूर (प्रतिनिधी)


युवकांनी शिक्षणाचा उपयोग उद्योग व व्यवसाय करत ध्येयसिद्धी कडे वाटचाल करून उंच भरारी घ्यावी.असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांनी केले.


अहमदपूर येथील अरिहंत फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स माॅलच्या उद्घाटन प्रसंगी ना.संजय बनसोडे बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याच्या पणन महासंघाचे चेरमन तथा अहमदपुर चाकुर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके,माजी आ. गुरुनाथराव कुरुडे , उद्योजक सोमचंद पोकर्णा, सभापती शिवानंद हेंगणे, जि.प.सदस्य माधव जाधव,
जि.स.पुरूषोत्तम धोंडगे, उपनगराध्यक्ष मनमथअप्पा किडे,शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी,पोलीस उपाधिक्षक बलराज लंजीले,माजी नगराध्यक्ष मुज्जीब पटेल जहागिदार, जिल्हा सरचिटणीस सांब महाजन,माजी सभापती चंदकांत मद्दे,महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षीताई शिंगडे,माजी जि.प.सदस्य हेंमत पाटील,ता.अध्यक्ष शिवाजीराव देशमुख,ता. अध्यक्ष अर्जुन आगलावे, भाजपा ता.अध्यक्ष हणमंत देवकत्ते,नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, नगरसेवक अभय मिरकले, नगरसेवक सिद्धार्थकुमार सुर्यंवशी,जिल्हा सरचिटणीस महेश देवणे , गोपिकिशन भराडीया,रिपाईचे बाबासाहेब कांबळे, नगरसेवक भैय्याभाई सरवरलाल,चंद्रशेखर भालेराव,आदिची उपस्थिती होती..


पुढे बोलताना ना.बनसोडे म्हणाले की अभिलाष पोकरणा सारख्या युवकाने मेट्रो सिटीला लाजवेल अशा पद्धतीचा माॅल निर्माण करून त्याच्या शिक्षणाचा खरा उपयोग त्यांनी व्यवसायामध्ये करून घेतला आहे.एखाद्या तालुक्या सारख्या ठिकाणी एवढी मोठी गुंतवणूक करणं हे सोपं काम नाही त्यासाठी त्याला जिद्द चिकाटी आणि खूप मेहनत करावी लागली असेल भरकटत चाललेल्या तरुण पिढीला अभिलाष पोकरणा नक्कीच दिसावा लागेल युवकांनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही उद्योग व्यवसायाकडे वळावे असेही ते म्हणाले.


दिवसेंदिवस कालमान चक्र बदलत असून या धरतीला वाचवायचे असेल तर वृक्षाचे संवर्धन केले पाहिजे. ऋतुचक्र बदलत असून कधी पाऊस पडतो कधी उघडतो कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाशी माणसाला सामना करावा लागतो चक्रीवादळा सारखा तडाखा आज बसतो आहे. या अस्मानी संकटापासून आपला बचाव करायचा असेल तर झाडे लावली पाहिजेत पंचमहाभूतांचे संरक्षण करण्यासाठी वसुंधरा अभियान मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याच्या वतीने आम्ही राबवत आहोत.जिथे मोकळी जागा असेल तिथे झाडे लावली पाहिजेत मातोश्री पांदण रस्त्या साठी एका किलोमीटरला 24 लक्ष रुपये देण्यात येत आहेत असेही ना.बनसोडे म्हणाले.


या प्रसंगी अध्यक्षीय समारोपात आ. बाबासाहेब पाटील म्हणाले की तरुण मित्रांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे व्यवसाय करताना कुठल्याही प्रकारची लाज मनात न ठेवता कोणतेही काम हाती घेऊन त्याचा शेवट केला पाहिजे. मारवाडी,कोमटी समाज जसे चिकाटीने व्यवसाय करतात त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवुन व्यवसाय केला पाहिजे. राजकारणही वाईट नाही पंरतु राजकारणातील काही भ्रष्ट लोकामुळे चांगल्या राजकीय लोंकाची बदनामी होत असते.राजकारण करत करत आपण चांगल्या प्रकारचे उदयोग करू शकतो याचे अनेक उदाहरणे देता येतील असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक अभिलाष प्रेमचंद पोकरणा यांनी केले सुत्रसंचलन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन जिवन गायकवाड यांनी मांडले…
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रपरिवार व अरिहंत ग्रुपने मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]