- प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन; ‘आयआयबी-इन्स्पायर’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे : “डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे ध्येय उराशी बाळगून तुम्ही अभ्यास करत आहात. अशा आव्हानात्मक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर ध्येयासक्ती, अभ्यासातील सातत्य व संघर्षाची तयारी असायलाच हवी. इतर विचार सोडून ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास आभाळही ठेंगणे होईल,” असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते, इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. ‘आयआयबी इन्स्टिटयूट’ सारखा मार्गदर्शक तुमच्यासोबत असल्यावर यश हमखास मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आयआयबी पुणे शाखेच्या वतीने ‘आयआयबी-इन्स्पायर’ कार्यक्रमात प्रा. नितीन बानगुडे पाटील हजारो विद्यार्थ्यांच्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. साधारण चार हजार विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घेतला. मोरवाडी येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमावेळी आमदार महेशदादा लांडगे, निवृत्त मुख्य न्यायाधीश एन. एस. लोहारे, कामगार नेते सचिनभैया लांडगे, मा. उपमहापौर तुषार भाऊ हिंगे, उपमहापौर नानी घुले, नगरसेवक समीर मासुळकर, नगरसेवक दिनेश यादव, प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश गुरुतवाड, पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे, यांच्या सह टीम आयआयबी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून आपण खंबीर असलो की, सर्वकाही शक्य होते. मनापासून प्रयत्न कराल, तर नक्की यशस्वी व्हाल. मला डॉक्टर व्हायचे होते; पण योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. तुम्हाला मात्र आज ‘आयआयबी इन्स्टिटयूट’ सारखी ‘डॉक्टर बनवणारी फॅक्टरी’ तुम्हाला मिळाली आहे. त्यामुळे तुमची जिद्द आणि त्यांची साथ एकत्रित झाली, तर देशाला चांगले डॉक्टर मिळतील.”
संस्थापकीय संचालक संचालक दशरथ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, अभ्यासात त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ‘इन्स्पायर’ हा कार्यक्रम राबविला जातो आहे.
ऍड. महेश लोहारे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आदरणीय चौगुले सरांनी विद्यार्थी व पालकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी 23 वर्षांपूर्वी एक छोटेसे रोपटे लावले होतें ज्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे सांगत श्री. चौगुले सरांनी निवृत्ती घेत सक्षम टीम ची उभारणी करत विद्यार्थी हित जपत सामाजी बांधिलकी ठेऊन वाटचाल करावी अशा सूचना केल्याचे सांगितले. १०० टक्के निकालाची शाश्वती घेऊन आयआयबीचा प्रवास सुरु असून, चार विद्यार्थ्यांवर सुरु झालेले हे इन्स्टिटयूट आज नांदेडसह लातूर, पुणे व कोल्हापूर येथे यशस्वीपणे ४० हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना दिला
तसेच या वर्षीची दहावी मधून अकरावी मधे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीं शिष्यवृत्ती परीक्षा येत्या 22 जानेवारी ला ऑनलाईन पद्धतीने होईल व त्या मधे गुणवत्ते प्रमाणे विद्यार्थ्यांना 100 टक्के पर्यंत शिष्यवृत्ती मिळेल.”
अकेड्मिक संचालक डॉ महेश पाटील यांनी आयआयबी च्या आत्तापर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकत आगळा वेगळा आयआयबी पॅटर्न:
‘आयआयबी महाफास्ट’ या उपक्रमातून शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून, त्यातून यशस्वी, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य केले जाणार आहे.”
आयआयबी पीसीबी संचालक प्रा.वाकोडे पाटील यांनी, “अल्पावधीतच ‘आयआयबी’ महाराष्ट्राचा महाब्रँड म्हणून ओळख मिळाली असल्याचे सांगत. पिंपरी चिंचवड पाठोपाठ आता पुण्यातही आयआयबी ची द्वितीय शाखा सुरु झाली असून डॉक्टर पुणे शहरातही डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयआयबी’चे मार्गदर्शन मिळणार आहे.