राजकारण असो की समाजकारण गुणवत्तेला प्राधान्य
देण्याची परंपरा पूढे कायम चालवली जाईल
समाजाच्या प्रगतीसाठी यलम मित्र सेवा संस्थेच्या वतीने
आखलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल
गुणवंत विद्यार्थ्यी सत्कार सोहळयात
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची ग्वाही
लातूर प्रतिनिधी १५ ऑगस्ट २०२२ :
लातूर जिल्ह्यात राजकारण असो की समाजकारण या क्षेत्रात काम करताना आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी कायम गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे काम केले आहे. आपण सर्वजण त्याच संस्कारात वाढलेले असल्यामुळे ती परंपरा आज सुरू ठेवली आहे आणि भविष्यात ही ती कायमपणाने चालवली जाईल अशी ग्वाही राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यलम समाजाच्या वतीने आयोजित गुणवंताच्या सत्कार सोहळयास बोलतांना दिले. समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी यलम समाजाने जे संकल्प केले आहेत, ज्या ज्या योजना आखल्या आहेत त्यांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
लातूर येथे यलम समाजाच्या वतीने आयोजित गुणवंतांचा सत्कार सोहळा सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी लातूर शहरातील अंबाजोगाई रोड येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे यलम मित्र सेवा संस्थेच्या वतीने आयोजित यलम समाजातील गुणवंत विद्यार्थ्यी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार अमित देशमुख प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षा, वैदयकीय प्रवेशाची नीट परीक्षा, इयत्ता पाचवी, दहावी व बारावी परीक्षेतील अनुसया नागिमे, कैवल्य गोजमगुंडे, सचिन बरुरे, अक्षय नलवाडे, दिपाली मोरामपल्ले, रिशा जटाळ, मधुरा बडगिरे, डॉ. रितेश कोतवाल आदी विद्यार्थ्यांचा तसेच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, प्रा.शिवराज मोटेगावकर, सुनील कुंठे, डॉ. रामभाऊ बरुरे, सचिन कासले आदींचा विशेष सत्कार करण्यात आला तर विलास गुरमे यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, डी.एन.शेळके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रा. शिवराज मोटेगावकर, माजी नगरसेवक रवी सुडे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, यलम समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी पूढे बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, यलम समाज भारत व महाराष्ट्रात संख्येने कमी आहे, तरी यलम समाजाने उल्लेखनीय कामगिरी केली ती अनन्यसाधारण कौतुकास्पद आहे. या समाजाशिवाय राजकीय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. लोकनेते विलासराव देशमुख यांनी गुणवत्तेला प्राधान्य दिले त्याला पुढे आणले हा विचार त्यांनी जोपासला तोच विचार मी आणि माझे सहकारी पुढे घेऊन जात आहोत. लोकनेते विलासराव देशमुख यांनी विक्रम गोजमगुंडे यांना लातूरचे नगराध्यक्ष केले, नामदेवराव पाटील यांना संचालक केले, विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे महापौर झाले यलम समाजाने याचा विचार केला पाहिजे आम्ही गुणवत्ता पाहिली गुणवंत विद्यार्थ्यांना मी मदत करतो त्यांचे नावे मला कळवा या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे आपल्या समाजातील गुणवंत पुढे येत आहेत याचेही आम्हाला कौतुक आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, यलम समाजाच्या गुणवंत गरीब विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह व्हावे यासाठी आम्ही तत्पर आहोत, लातूर जिल्ह्यासाठी जे काही करावे लागेल ते करू लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारानी आपण वाढलो असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम बरुरे यांनी करून यलम मित्र सेवा संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तर माजी आमदार बब्रुवान खंदाडे, डी.एन.शेळके, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत आरडले व कातपुरे मॅडम यांनी केले.
——-