पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते लातूर जिल्हा काँग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन
लातूर
पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते लातूर जिल्हा कॉंग्रेस व लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने आज सोमवार दिनांक 21 मार्च रोजी सकाळी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरातील गांधी चौक येथील विलासराव देशमुख शासकीय सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल,आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले,जे जे हॉस्पिटलच्या डॉ. रागिनी पारेख, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.तिमिरातुनी तेजाकडे अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया डॉक्टर तात्याराव लहाने व त्यांच्या 65 तज्ञ डॉक्टर मार्फत करण्यात आली.
याप्रसंगी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मनोज राखा, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सूर्यशीलाताई मोरे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस मोइज शेख, डॉ संतोष डोपे, डॉक्टर उदय मोहिते, डॉक्टर हनमंत किनिकर, डॉक्टर निकिता देशपांडे, डॉक्टर शैलेंद्र चव्हाण, डॉक्टर महेंद्र कांबळे, डॉक्टर सुरेश चवरे, डॉक्टर संतोष भांगारकर, डॉक्टर अमृता पोहरे, प्रवीण सोनवणे, प्रविण पाटील, सचिन दाताळ, ॲड. बाबासाहेब गायकवाड, प्रा. एकनाथ पाटील, प्रा.ओमप्रकाश झुरळे, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, प्राध्यापक सुधीर पोद्दार, आबासाहेब पाटील उजेडकर, सुरेश चव्हाण, सुभाष घोडके, प्रा. एम.पी.देशमुख आदीसह काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष उपस्थित होते. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिबिराच्या आयोजनाची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांब्रे यांनी केले तर तर शेवटी आभार सोनू डगवाले यांनी मानले.