इचलकरंजी ; दि. ९( चिदानंद आलुरे ) —
डिझाईन व्यवसायातील अग्रगण्य असलेले नाव मॉडीफाय डिझाईन यांचे मालक श्री संतराम शंकर चौगुले यांचे (वय वर्ष ६०) आज रविवार दि ९ रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
1985 साली उदरनिर्वाह करता म्हाकवे, तालुका-कागल येथून संतराम चौगुले हे इचलकरंजी येथे वास्तव्यास आले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाटचाल करीत १९८५ ते १९९५ ही दहा वर्षे त्यांनी (दैनिक मँचेस्टर) आजचे दैनिक महासत्ता मध्ये कंपोझिटर ते कॉम्प्युटर डिझायनर म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते 1995 ते 1997 या काळात ते चिपळूण येथे केसरी या दैनिकांमध्ये कॉम्प्युटर डिझाईनर ऑपरेटर म्हणून काम केले. आप्पासाहेब रानडे यांच्या मदतीने 1997 सालापासून त्यांनी स्वतः मॉडीफाय डिझाईन या नावाने इचलकरंजी मध्ये ऑफिस चालू केले. त्यांचा अनुभव व व्यवसायामध्ये काळाप्रमाणे बदल करत गेल्याने व उच्च तंत्रज्ञान अवगत करत मॉडीफाय डिझाईन नावारूपास आणले. त्यांचा मनमिळावू व शांत स्वभाव हा लोकांना आवडत. प्रत्येकाशी सौजन्याने व आपुलकीने वागत असे.
प्रिंटिंग असोसिएशन इचलकरंजी चे माजी अध्यक्ष व संस्थापक सदस्य होते. तसेच ते सल्लागार म्हणून सध्या कार्यरत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आसमा या संघटनेचे सदस्य व महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे ते विद्यमान सदस्य होते. त्यांच्या या अचानक झालेल्या एक्झिट मुळे प्रिंटिंग-डिझायनिंग व्यवसायमध्ये न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनामुळे इचलकरंजी प्रिंटिंग व्यवसाया मध्ये शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.