पंढरपूर: आज आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापुजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व सौ.लता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी मानाचे वारकरी म्हणून गेवराई तालुक्यातील श्री व सौ जिजाबाई मुरली नवले यांना मुख्यमंत्री सोबत महापुजेचा मान मिळाला, त्याप्रसंगी मंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील श्री संभाजी शिंदे, मुलगा श्री श्रीकांत एकनाथ शिंदे, नातू , श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व ईतर मान्यवर उपस्थित होते.